Join us  

घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी ‘प्लाझ्मा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 1:02 AM

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर । रोज चार मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईवरील कचºयाचा भार कमी करण्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा करणे, ओल्या कचºयावर इमारतीच्या आवारातच प्रक्रिया करणे असे उपक्रम महापालिका राबवत आहे. मात्र घराघरांतून जमा होणाºया घातक सुक्या कचºयाची विल्हेवाट लावणे एक मोठे आव्हान ठरत आहे. यासाठी आता आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये ‘प्लाज्मा’ या अत्याधुनिक पद्धतीने कचरा विलगीकरण, विघटन आणि प्रक्रिया वेगाने होणार आहे. याद्वारे दररोज चार मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया होणार आहे.मुंबईतून दररोज सुमारे सहा हजार ८०० मेट्रिक टन इतका कचरा निर्माण होत आहे. यापैकी सुमारे पाच मेट्रिक टन कचºयावर कांजूरमार्ग येथे शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करण्यात येते. तर देवनार डम्पिंग ग्राउंडजवळ सुमारे १८०० मेट्रिक टन इतक्या कचºयाची पारंपरिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत आहे. तसेच प्लास्टीक कचºयाची विल्हेवाट पुन:प्रक्रियेतून लावण्यात येते. तरीही काही प्रमाणात ओला आणि सुका कचरा एकत्रच जमा होतो. यामध्ये जमा होणाºया ओल्या आणि सॅनिटरी पॅडसारखा घातक कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर पालिकेने कचरा प्रक्रियेसाठी ‘प्लाज्मा’ तंत्रज्ञान आणण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरामध्ये ही यंत्रणा उभारली जाणार आहे. प्लाज्मा तंत्रज्ञानाने कचरा विल्हेवाटीसाठी सहा कोटी ८६ लाख ९० हजार १६० रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये ठेकेदाराला शहर आणि दोन्ही उपनगरांत प्रत्येकी एक ‘प्लाज्मा’ यंत्रणा उभारून काम करावे लागेल. या कामाचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.प्रदूषणाचा धोका नाहीसॅनिटरी पॅडसारखा कचरा उघड्यावर जाळता येत नाही. मात्र ‘प्लाझ्मा’ तंत्रज्ञानात बंदिस्त व्यवस्थेत कचºयावर मॉक्युलर सेपरेशन, लिक्विड रूपांतर, गॅस स्वरूप आणि त्यानंतर प्लाज्मा तंत्रज्ञानातून कचºयाची विल्हेवाट लावली जाणार आहे. यामध्ये चुंबकीय पद्धतीने उच्च दाबाने कचºयाची विल्हेवाट बंदिस्त स्वरूपात लावल्यामुळे प्रदूषणाचा धोकाही टळणार आहे.