Join us  

नियोजन : मुंबईतून बेपत्ता झालेल्या १२६ मुलींचे गूढ कायम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतून गेल्या ११ महिन्यात ७०८ मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली. यापैकी ५८२ मुलींचा शोध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतून गेल्या ११ महिन्यात ७०८ मुलींच्या अपहरणाची नोंद करण्यात आली. यापैकी ५८२ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यात १२६ मुलींच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ कायम आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

एनसीआरबीच्या २०१९च्या अहवालानुसार, राज्यभरातून ५६ हजार ७५० पुरुष आणि ६७ हजार ७४६ महिला आणि १९ तृतीय पंथी असे एकूण १ लाख २४ हजार ५१५ जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस दफ्तरी झाली. त्यापैकी ६७ हजार १८ जणांचा शोध घेण्यास यश आले. यात अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक होते.

अशात मुंबईतही अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. यात, लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत याचे प्रमाण घटले आहे. मुंबई पोलिसांच्या आकडेवाऱीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेबर अखेरपर्यंत ७०८ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. अल्पवयीन असल्याने याप्रकरणी अपहरणाची नोंद करत अधिक तपास सुरू करण्यात आला. यापैकी ५०८ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहेत. २०१९ मध्ये १२४० मुलींच्या अपहरणाची नोंद झाली होती. त्यापैकी १०७६ मुलींचा शोध घेण्यास यश आले.

याचबरोबर तरुणी आणि ज्येष्ठ नागरिक बेपत्ता होण्याच्या घटनाही डोके वर काढत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात मिसिंग पथक कार्यरत आहेत. हे मिसिंग व्यक्तीसाठी कार्यरत आहेत.

....

२०२०

बेपत्ता - ७०८ / शोध ५०८

....

पालक ओरडले म्हणून सोडले घर

बऱ्याच प्रकरणात मोबाइलचा अतिवापर, गेम, अभ्यास न करणे, शिवाय क्षुल्लक कारणातून पालक ओरडले म्हणून घर सोडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर काही प्रकरणात प्रेम प्रकरण, फूस लावून पळवून नेण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

.....

कुठल्या महिन्यात किती बेपत्ता

जानेवारी - ९३

फेब्रुवारी - १०६

मार्च - ७१

एप्रिल - २२

मे - ४०

जून - ४५

जुलै - ५५

ऑगस्ट - ७६

सप्टेंबर - ७७

ऑक्टोबर - ९५

नोव्हेबर - ९४