मुंबई : एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे या शहरांचा यामध्ये समावेश आहे. महिलांविरोधी गुन्ह्यांत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोषसिद्धी दर ३० टक्क्यांंवर आहे.
एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०१९ अखेरीस राज्यात महिलांविरोधी गुन्ह्यांशी संबंधित दोन लाख सात हजार (९४ टक्के) खटले प्रलंबित आहेत. न्यायालयांनी वर्षभरात सुमारे १३ हजार खटले निकाली काढले. दीड हजार खटल्यांमधील आरोपींचा गुन्हा सिद्ध होऊ शकला, त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. साडेनऊ हजार खटल्यांमधील आरोपी पुराव्यांविना निर्दोष सुटले. धक्कादायक बाब अशी की, उत्तरप्रदेश (५५.२ टक्के), राजस्थानच्या(४५ टक्के) तुलनेत राज्याचा दोषसिद्धी दर खूपच कमी (१३.७ टक्के) आहे.
एनसीआरबीने देशातील १९ महानगरांमधील गुन्हेगारीचा आढावा घेतला. त्यात राज्यातील मुंबई, नागपूर आणि पुणे शहरांचा समावेश आहे. यामध्ये महिलांविरोधी गुन्ह्यांत दिल्ली पहिल्या क्रमांकावर (१२ हजार ९०२) तर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर (६ हजार ५१९) आहे. नागपूर शहरात १,१४४ गुन्हे नोंद झाले आहेत. नागपूरचे गुन्हे प्रमाण मुंबईपेक्षा कमी आहे. नागपूर शहरात महिलांविरोधी गुन्ह्यांशी संबंधित ९६ टक्के खटले प्रलंबित आहेत. दोषसिद्धी दर १० टक्क्यांहून कमी आहे.
....
कायद्यातील पळवाटा...
कायद्यातील विविध पळवाटा तसेच पुरावे गोळा करण्यास होणारी दिरंगाई, दोषसिद्धीसाठी होणाऱ्या विलंबामुळे गुन्हेगार सुटताना दिसत आहे. अनेक प्रकरणांत साक्षीदार माघार घेत असल्यामुळे गुन्हा सिद्ध होण्यास अडचणी निर्माण होतात.
...
राज्यात ९४ टक्के खटले प्रलंबित...
राज्यात महिलांविरोधी गुन्ह्यांशी संबंधित ९४ टक्के खटले प्रलंबित आहेत.
....