चाक निखळूनही विमानाचे मुंबईत थरारक लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:23 AM2021-05-07T06:23:20+5:302021-05-07T06:24:42+5:30

विझक्रॉफ्ट कंपनीचे विमान होते. वैमानिक केसरी सिंग हे या विमानाचे पायलट होते. तासाभरापूर्वी अलर्ट आला होता. अशावेळी विमानाचे वजन कमी होणे गरजेचे होते.

The plane made a thrilling landing in Mumbai even after the wheel came off | चाक निखळूनही विमानाचे मुंबईत थरारक लँडिंग

चाक निखळूनही विमानाचे मुंबईत थरारक लँडिंग

Next

मुंबई : नागपूरहूनमुंबई येथे येणाऱ्या एका नॉन शेड्यूल विमानात गुरुवारी रात्री तांत्रिक बिघाड झाला.  तत्काळ हे विमान छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास अगदी सुखरुप उतरविण्यात आले.

विझक्रॉफ्ट कंपनीचे विमान होते. वैमानिक केसरी सिंग हे या विमानाचे पायलट होते. तासाभरापूर्वी अलर्ट आला होता. अशावेळी विमानाचे वजन कमी होणे गरजेचे होते. परिणामी तासभर हे विमान आकाशात उडविण्यात आले. त्यानंतर हे विमान विमानतळावर उतरविण्यात आले. हे सगळे  सुरू असतानाच मुंबई विमानतळावर अलर्ट देण्यात आला होता. जास्त मोठी धावपट्टी मिळावी यासाठी मुंबई  विमानतळाची निवड करण्यात आली.
सुदैवाने हे सगळे करताना स्फोट झालेला नाही. आग लागलेली नाही. अनेक वेळा जास्त इंधन असेल तर विमानाला धक्का बसतो. अशावेळी चांगले वैमानिक इंधन संपविण्याचा निर्णय घेतात. इंधन संपविले जाते. मग विमान खाली उतरविले जाते. या प्रकरणात हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, विमान सेवा क्षेत्रात कार्यरत असलेले मंदार भारदे  यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन करण्यात आले. 

मुंबई विमानतळावर इमर्जन्सी  लँडिंग होणार आहे, असा मेसेज आल्यानंतर मंदार भारदे आणि त्यांची टीम तातडीने विमानतळावर गेली. हे विमान जेटसर्फ कंपनीचे होते. राजस्थान सरकार मध्ये पायलट म्हणून काम केलेले आणि आता खाजगी विमानाचे सारथ्य करणारे कॅप्टन केसरी सिंग करत होते. त्यांनी जीवावर उदार होऊन हे लँडिंग केले. अशा पद्धतीचे लँडिंग करणे अत्यंत कठीण असते. पण त्यात त्यांना यश आले. मंदार भारदे लोकमतशी बोलताना म्हणाले, अशाप्रकारचे लँडिंग करताना विमान पोटावर उतरवावे लागते. या विमानाचे एक चाक निघून गेले होते. त्यामुळे त्याचे लँडिंग गियर ओपन होत नव्हते. अशावेळी हे विमान उतरवताना पोटावर उतरवले, तर आत असणाऱ्या पेट्रोलचा स्फोट होण्याची शक्यता असते. नागपूरहून विमान निघाले त्याच वेळी त्याचे एक टायर तुटून गेले होते. विमानात पेट्रोल भरपूर होते. त्यामुळे विमान पोटावर लँड करताना स्फोटाची भीती होती. कॅप्टननी आधी इमर्जन्सी लँडिंगची परवानगी घेतली, आणि पेट्रोल संपेपर्यंत विमान एक तास हवेत फिरवत ठेवले. ज्यावेळी लँड करण्याइतपत पेट्रोल विमानात शिल्लक राहिले त्यावेळी त्याचा अंदाज घेऊन त्यांनी हे विमान उतरवले. यासाठी लागणारा वेळ आणि पेट्रोल याचे अचूक गणित मांडता आले पाहिजे. ते त्यांनी मांडल्यामुळे विमानाचा स्फोट न होता विमान व्यवस्थित लँड झाले. विमानात एक रुग्ण होता ज्याला मुंबईत उतरवण्यात आले आहे.

नागपूर ते मुंबई मार्गावरील नॉन-शेड्यूल बीक्राफ्ट व्हीटी-जिल विमानात क्रूचे २ सदस्य, १ रुग्ण, १ नातेवाईक आणि १ डॉक्टर होते. अग्निशमन आणि बचाव प्रतिसादक, फलो वाहने, सीआयएसएफ, वैद्यकीय पथक यांच्यासह विमानतळांच्या आपत्कालीन प्रतिसाद पथकास प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्वरित मदत करण्यात आली.  छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावरील विमाने वेळापत्रकानुसार आहेत.

Read in English

Web Title: The plane made a thrilling landing in Mumbai even after the wheel came off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.