Join us  

पीयूष गोयल पॉलिटिशियन आॅफ द इयर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 6:44 AM

जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळपद प्राप्त केलेल्या ‘लोकमत’ समूहाने कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा मंगळवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’ हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला.

मुंबई : जगभरातील मराठी माणसांच्या मनात अढळपद प्राप्त केलेल्या ‘लोकमत’ समूहाने कोट्यवधी वाचकांच्या वतीने विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणाऱ्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वांच्या कार्याचा मंगळवारी ‘लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८’ हा पुरस्कार देऊन यथोचित गौरव केला. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना ‘पॉलिटिशियन आॅफ द इयर’ म्हणून गौरविण्यात आले.एकापेक्षा एक प्रबळ दावेदार असल्याने कुणाच्या कार्याचा सन्मान होणार, याची उत्कंठा क्षणाक्षणाला शिगेला पोहोचवणारा हा सोहळा एनएससीआयच्या भव्यदिव्य डोममध्ये जल्लोषात साजरा झाला. यूपीएल प्रस्तुत अणि मनी ट्रेड कॉइन ग्रुप समर्थीत या नेत्रदीपक सोहळ्याचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह हजारो वाचक साक्षीदार झाले. एकूण १४ क्षेत्रांतील नामांकनांपैकी एकेक पुरस्कार जाहीर होत गेला. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या गौरवाला डोममध्ये जमलेल्या हजारो हातांनी टाळ्यांचा कडकडाट करून कुर्निसात केला.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ‘यूपीएल’चे ग्लोबल सीईओ जय श्रॉफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्याला रेल्वेमंत्री पीयूष गोयल, बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार अक्षय कुमार, करिना कपूर, जितेंद्र, गुलशन ग्रोवर, अन्नू मलिक, सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, पशुसंवर्धन, दुग्धमंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खा. पूनम महाजन, खा. राजू शेट्टी, माजी मंत्री सुनील तटकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, आ. जितेंद्र आव्हाड, भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, उद्योजक गौतम सिंघानिया, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त दत्तात्रेय पडसलगीकर यांच्यासह उद्योग, समाजकारण, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मंगळवारी रात्री उशिरापर्यंत उत्तरोत्तर रंगला.या बहारदार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरने केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘फरजन’ या आगामी युद्धपटावर आधारित असलेल्या चित्रपटातील ‘उदे उदे गं अंबाबाई..’ या नृत्याने झाली.>विविध क्षेत्रातील या कर्तृत्वान व्यक्तींचा सन्मानलोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर-२०१८ च्या या सोहळ्यात शिक्षणमहर्षी व बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, विशेष पुरस्कारांमध्ये अभिनेता अक्षयकुमार यांना ‘सामाजिक जाणिवे’साठी, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना ‘महाराष्ट्रभूषण’, अभिनेत्री करिना कपूर ‘पॉवर आयकॉन’ आणि ग्लोबल टॉर्च बिअरर हा पुरस्कार मराठीचा झेंडा सातासमुद्रापार फडकवणाºया लंडनच्या महाराष्ट्र मंडळाचे मुकुंद नवाथे यांनी स्वीकारला. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ‘महाराष्ट्राचा अभिमान’ या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात आले. सर्वांची नजर असलेला ‘प्रभावी राजकीय नेता’ हा पुरस्कार विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना प्रदान करण्यात आला. रंगभूमी विभागातील कामगिरीसाठी महिला गटात ऋतुजा बागवेला ‘अनन्या’ नाटकातील भूमिकेसाठी, तर ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कुलकर्णी यांना तीन नाटकांच्या ‘त्रिधारा’साठी पुरुष गटातून सन्मानित करण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कारासाठी बुद्धिबळाच्या ६४ घरांची राणी आकांक्षा हगवणेला सन्मानित करण्यात आले. प्रशासन (आयपीएस) विभागात गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढणारे जिगरबाज पोलीस अधिकारी अभिनव देशमुख यांच्या कार्याला ‘लोकमत’ने सलाम केला. प्रशासन (आयएएस) विभागात लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना त्यांच्या लोकाभिमुख कार्यासाठी गौरवण्यात आले. चित्रपट (पुरुष) विभागामध्ये सुमित राघवन यांचा ‘आपला माणूस’ अव्वल ठरला. याच विभागात प्रचंड चुरस असलेल्या महिला गटात हा पुरस्कार विभागून देण्यात आला. त्यात ‘कासव’कार सुमित्रा भावे आणि ‘गुलाबजाम’चा गोडवा मराठी रसिकांना देणाºया सोनाली कुलकर्णी या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. वैद्यकीय सेवा देताना रुग्णांच्या चेहºयावर हास्य फुलवण्यासाठी धडपडणारे डॉ. मिलिंद कीर्तने यांचा गौरव करण्यात आला. समाजसेवा पुरस्कार भारतीय जैन संघटनेचे शांतिलाल मुथा आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्य करणारे सेवाव्रती दिनकर कांबळे यांना विभागून देण्यात आला. परफॉर्मिंग आर्टमध्ये स्वरांची जादूगार श्रेया घोषाल यांना सन्मानित करण्यात आले. सिनेक्षेत्रात पदार्पणापूर्वी गायलेले ‘मोगरा फुलला’ हे गाणे त्यांनी गायिले आणि त्या स्वरलहरींचा सुगंध सर्वत्र दरवळत राहिला. युवा राजकारणी म्हणून खा. पूनम महाजन यांचा गौरव करण्यात आला. सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) पुरस्कार प्रॉक्टर अ‍ॅण्ड ग्लॅम्बलला, तर उद्योग क्षेत्रासाठी राहुल धूत यांचा सन्मान झाला.>बंधूप्रेमाची गळाभेट...‘प्रभावी राजकीय नेता’ म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नावाची घोषणा होताच समोरच्या रांगेत बसलेल्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यासपीठावर येऊन धनंजय यांचे अभिनंदन करत गळाभेट घेतली. हा क्षण उपस्थितांना भारावून टाकणारा होता. राजकारणातील संघर्षामुळे दुरावलेल्या या बहीणभावाची ही गळाभेट या सोहळ्यातील परमोच्च बिंदू ठरला.>पुरस्कार विजेते१. रंगभूमी (पुरुष) : चंद्रकांत कुलकर्णी२. रंगभूमी (महिला) : ऋतुजा बागवे३. क्रीडा : आकांक्षा हगवणे४. प्रशासन (आयपीएस) : अभिनव देशमुख५. प्रशासन (आयएएस) : जी. श्रीकांत६. चित्रपट (पुरुष) : सुमित राघवन७. चित्रपट महिला (विभागून) : सुमित्रा भावे, सोनाली कुलकर्णी८. वैद्यकीय : डॉ. मिलिंद कीर्तने९. समाजसेवा (विभागून) : शांतिलाल मुथा, दिनकर कांबळे१०. परफॉर्मिंग आर्ट : श्रेया घोषाल११. युवा राजकारणी : खा. पूनम महाजन१२. पॉवरफुल पॉलिटिशन : धनंजय मुंडे१३. सीएसआर : प्रॉक्टर अँड ग्लॅम्बल१४. उद्योग : राहुल धूत> विशेष पुरस्कार१. जीवनगौरव : डॉ. डी.वाय. पाटील२. महाराष्ट्राचा अभिमान : रवी शास्त्री३. पॉवर आयकॉन : करीना कपूर४. पॉलिटिशियन आॅफ द इयर : पीयूष गोयल५. सामाजिक जाणीव : अक्षयकुमार६. ग्लोबल टॉर्च बिअरर : मुकुंद नवाथे, महाराष्टÑ मंडळ, लंडन

टॅग्स :लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८पीयुष गोयल