सांसर्गिक उपचारांसाठी हवी कायमस्वरूपी रुग्णालये - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 07:14 AM2020-07-08T07:14:01+5:302020-07-08T07:16:57+5:30

सिडकोच्या साहाय्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहिसर येथे, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स येथे ६०० बेड व बीकेसी येथे १२० खाटांचे आयसीयू अशा ३,५२० बेड्सच्या जम्बो सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

Permanent hospitals needed for contagious treatment - CM | सांसर्गिक उपचारांसाठी हवी कायमस्वरूपी रुग्णालये - मुख्यमंत्री

सांसर्गिक उपचारांसाठी हवी कायमस्वरूपी रुग्णालये - मुख्यमंत्री

googlenewsNext

मुंबई : मुंबईत चार ठिकाणी उभारलेल्या विविध कोरोना आरोग्य केंद्रातील एकूण ३,५२० खाटांच्या जम्बो सुविधेचे मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद््घाटन केले. मुंबईत सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचारांसाठी कायमस्वरूपी रुग्णालयाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

सिडकोच्या साहाय्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या सहकार्याने दहिसर येथे, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून नमन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्स येथे ६०० बेड व बीकेसी येथे १२० खाटांचे आयसीयू अशा ३,५२० बेड्सच्या जम्बो सुविधांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त आय. एस. चहल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनासाठी संपूर्ण देशात महाराष्ट्राने सर्वप्रथम मोकळ्या मैदानावरील रुग्णालये ही संकल्पना आणली. या रुग्णालयांत आयसीयू सुरू करण्याची विक्रमी कामगिरी महाराष्ट्राने केली. ही सुविधा तात्पुरती असली, तरी मुंबई महानगरात सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचारांसाठी कायमस्वरूपी रुग्णालय तयार करण्याची आवश्यकता आहे.

सिडकोच्या पुढाकाराने मुलुंडमध्ये लालबहादूर शास्त्री मार्गालगतच्या जागेत १,६५० खाटांचे कोरोना आरोग्य केंद्र उभारले आहे. यापैकी १,००० खाटा आॅक्सिजन सोर्इंनीयुक्त असून ६५० खाटा विलगीकरणासाठी आहेत. येथील ५०० खाटा ठाणे पालिकेसाठी आरक्षित आहेत. दहिसर येथे मुंबई मेट्रोच्या सहकार्याने ९५५ खाटांचे रुग्णालय उभारले असून, तेथे १०८ खाटांचे आयसीयू आहे. येथील २०० खाटा मीरा-भार्इंदर पालिकेसाठी आहेत. नमुन समूहातर्फे महालक्ष्मी रेसकोर्सवर ६०० खाटांचे कोरोना उपचार केंद्र सुरू केले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने उभारलेल्या दुसऱ्या टप्प्यातील कोरोना केंद्रात ११२ खाटा अतिदक्षता उपचारासाठी असतील.

Web Title: Permanent hospitals needed for contagious treatment - CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.