Join us  

पुलंच्या साहित्यासाठी कालबद्ध योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 2:10 AM

पु.ल. देशपांडे यांनी मराठी क्षेत्राला आणि साहित्याला जो कलेचा वारसा दिला आहे तो अमूल्य आहे. पुलंचे साहित्य आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त शासनाच्या वतीने एक कालबद्ध योजना

मुंबई : पु.ल. देशपांडे यांनी मराठी क्षेत्राला आणि साहित्याला जो कलेचा वारसा दिला आहे तो अमूल्य आहे. पुलंचे साहित्य आजच्या युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांच्या जनशताब्दी वर्षानिमित्त शासनाच्या वतीने एक कालबद्ध योजना आखण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी सांगितले.रवींद्र नाट्य मंदिरात बुधवारपासून सुरू झालेल्या पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या वतीने सात विविध कलाविष्कारांवर आधारित पु.ल. कला महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री तावडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेता मनोजजोशी, प्रमोद पवार आदी उपस्थित होते. पु.ल. कला महोत्सवाला शुभेच्छा देताना तावडे म्हणालेकी, पुलंचे साहित्य, त्यांनीकेलेले लिखाण हे आजची पिढी मिस करत आहे. त्यामुळे त्यांचे जास्तीतजास्त साहित्य या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने आम्हीराज्य शासन म्हणून प्रयत्न करीत आहोत. याप्रसंगी पु.ल. अकादमीत भरविण्यात आलेल्या पुलंच्यासाहित्य कृतींवर आधारित प्रदर्शनाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्तेकरण्यात आले.