ँप्रशांत माने- कल्याण
नवरात्रौत्सवात दैवीशक्तीचा अगाध महिमा दुर्गासह अन्य विविध रूपात पहायला मिळणार आहे. याच शृंखलेत कल्याणच्या ‘रोगविनाशिनी’ म्हणून नावाजलेल्या माता शितलादेवीचा नवरात्रौत्सव देखील मोठया उत्साहात संपन्न होत आहे.
कांजण्या, गोवर आणि देवी रोगावर देवीच्या कृपेने ‘शितलता’ प्राप्त होते अशी आख्यायिका असताना अनेकांना संसारीक त्रिविधा तपातून मुक्तता मिळाल्याचे अनुभव येथे कथन केले जात आहेत.
कल्याण शहराची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या शिवाजी चौकात शितलादेवीचे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालिन आयुक्त टी.चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात झालेल्या रस्तारूंदीकरणात या जुन्या मंदिराचा काही भाग बाधित झाला होता. यानंतर येथेच 1994 मध्ये हे मंदिर नव्याने बांधण्यात आले. या मंदिरात प्रभाकर गोविंद पानेरकर हे पुजाअच्रेची जबाबदारी सांभाळत असून देवीच्या सेवेत असणारी त्यांची ही तिसरी पिढी आहे.
या शितलादेवीच्या जागृततेच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. येथील पुजारी असलेल्या पानेरकर यांनीही आपल्याला देवी कृपेचा ज्वलंत अनुभव आल्याचे सांगितले. तर केवळ कल्याण आणि आसपासच्या भागांमधूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून अनेक भक्त याठिकाणी दर्शनासाठी येतात. पूर्वीच्या काळी शिवाजी चौक हे ठिकाण गावाची वेस म्हणून ओळखले जायचे त्यामुळे ग्रामदेवतेची मूर्ती ही आपल्याला या ठिकाणी पहायला मिळते. तर ज्या लहान मुलांना देवी, गोवर किंवा कांजण्या आल्या असतील अशांना या मंदिरात आवजरून आणले जाते. देवीच्या पूजेबरोबरच देवीच्या स्नानाचे तीर्थ या मुलांच्या अंगावर शिंपडल्यानंतर त्यांची काहीली कमी होते, असा अनुभव अनेकांचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणो नवरात्रौत्सव या ठिकाणी मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. या काळात भजन, किर्तन यांसह गोंधळ असे विविध धार्मिक कार्यक्रम याठिकाणी आयोजिले जातात. यंदाही या कार्यक्रमांची रेलचेल असल्याची माहीती पानेरकर यांनी दिली.
माता शितलादेवी आणि ग्रामदेवता
4कांजण्या, गोवर आणि देवी रोगावर देवीच्या कृपेने ‘शितलता’ प्राप्त होते अशी आख्यायिका असताना अनेकांना संसारीक त्रिविधा तपातून मुक्तता मिळाल्याचे अनुभव येथे कथन केले जात आहेत.
4कल्याण शहराची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या शिवाजी चौकात शितलादेवीचे छोटेखानी मंदिर उभारण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेचे तत्कालिन आयुक्त टी.चंद्रशेखर यांच्या कार्यकाळात झालेल्या रस्तारूंदीकरणात या जुन्या मंदिराचा काही भाग बाधित झाला होता. यानंतर येथेच 1994 मध्ये हे मंदिर नव्याने बांधण्यात आले.