Join us

ठाण्यात 177 रस्त्यांवर होणार पार्किग!

By admin | Updated: November 8, 2014 22:45 IST

मागील दीड वर्षापासून कागदावर असलेले ठाणो महापालिकेचे पार्किग धोरण अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर प्रत्यक्षात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़

अजित मांडके - ठाणो
मागील दीड वर्षापासून कागदावर असलेले ठाणो महापालिकेचे पार्किग धोरण अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर प्रत्यक्षात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत़ नऊ प्रभाग समितीअंतर्गत 177 रस्त्यांवर हे पार्किग होणार असून या ठिकाणी दुचाकी, तीनचाकी, चारचाकी हलकी आणि अवजड अशी तब्बल 9 हजार 855 वाहने पार्क होणार आहेत. तसेच या कामासाठी 39क् पार्किग मार्शल आणि 34 पार्किग सुपरवायझर नेमण्यात येणार आहेत. परंतु, पालिकेने पार्किगचे जे दर ठरविले आहेत, ते महासभेने अमान्य केले असून केवळ पार्किग धोरणाला मान्यता दिली आहे. त्यामुळे दर न ठरविताच पालिकेने हे धोरण अमलात आणण्याचे निश्चित केले आहे.
पालिकेच्या या निर्णयामुळे सुरुवातीचे काही महिने ठाणोकरांना विनामूल्य पार्किगची सोय उपलब्ध होणार आहे. नव्या वर्षात या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. 
यासाठी वार्षिक 9 कोटी 59 लाख 22 हजार आणि भांडवली कामासाठी 4 कोटी 73 लाख 65 हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. नऊ प्रभाग समितीअंतर्गत हे धोरण राबविण्यात येणार असून यानुसार एकाच वेळी नऊ प्रभाग समितीअंतर्गत सुमारे 4 हजार दुचाकी आणि 2,5क्क् चारचाकी वाहने प्रत्येक तासाला पार्क होऊ शकतील. महापालिकेने याचे दरदेखील निश्चित केले होते. 
या नव्या धोरणानुसार नऊ प्रभाग समितीअंतर्गत चार टप्प्यांत पार्किग होणार आहे. यामध्ये ए श्रेणीत-मुख्य रस्ते - व्यावसायिक पार्किग, बी श्रेणीत- क्रॉस रस्ते, सी श्रेणीत- शाळा, हॉस्पिटल आणि डी श्रेणीत- रहिवासी क्षेत्र आदींचा समावेश आहे. 
या चार श्रेणींमध्ये पार्किग होणार असून पूर्वी गाडी पार्क केल्यावर दिवसभराचे केवळ 2 रुपये आकारले जात होते. परंतु, महापालिकेने हेच दर तासावर ठरविले असून  चार श्रेणींनुसार दर आकारले जाणार आहेत.
यानुसार, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात हे धोरण मंजुरीसाठी महासभेसमोर ठेवण्यात आले होते. परंतु, काही ठिकाणी रस्त्यांवर पार्किग होणार असल्याने नगरसेवकांनी याला विरोध दर्शविला. तसेच पालिकेने जे दर ठरविले होते, त्याला महासभेने विरोध केला होता. त्यामुळे पुन्हा हे धोरण लांबणीवर पडले होते. अखेर, आता दीड वर्षानंतर अडथळ्यांची शर्यत पार करून हे धोरण मार्गी लागले असून नगरसेवकांनी सुचविलेल्या सूचनांचा अंतर्भाव करून केवळ दोन स्पॉट यातील कमी करण्यात आले आहेत. आता या धोरणाला महासभेने मान्यता दिली असल्याने येत्या आठ दिवसांत यासंदर्भातील निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रंनी दिली. त्यानुसार, एक ते दोन महिन्यांत प्रत्यक्षात हे धोरण अमलात येईल, असा दावाही पालिकेने केला आहे.
 ठाणोकरांना  शिस्त लागावी आणि पार्किगमध्येच वाहन पार्क करावे, या उद्देशाने आता पालिकेनेदेखील जोर्पयत दर निश्चित होत नाहीत, तोर्पयत पार्किगचे दर आकारणार नसल्याचा पवित्र घेतला आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे ठाणोकरांना विनामूल्य पार्किगची सुविधा उपलब्ध होणार आहे. 
 
 नऊ प्रभाग समितीअंतर्गत या चारही श्रेणींची वर्गवारी करण्यात आली असून कळवा प्रभाग समितीअंतर्गत 1क् रस्त्यांवर एकूण 764, कोपरीमध्ये 2क् रस्त्यांवर 674, माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत 13 रस्त्यांवर 376, मुंब्रा प्रभाग समितीत 19 रस्त्यांवर 1347, नौपाडा 24 रस्ते असून येथे 18क्5, रायलादेवीमध्ये 34 रस्त्यांवर 2क्81, उथळसरमध्ये 26 रस्त्यांवर 1298, वर्तकनगरमध्ये 26 रस्त्यांवर 1127, वागळेमध्ये 5 रस्त्यांवर 383 असे एकूण 177 रस्त्यांवर दुचाकी, तीनचाकी, चारचाकी ही तब्बल 9 हजार 855 वाहने पार्क केली जाणार आहेत. या पार्किगच्या ठिकाणी 39क् पार्किग मार्शल, 34 पार्किग सुपरवायझर नेमण्यात येणार आहेत.
 
2क्क् वाहतूक मार्शल 
दर निश्चित झाल्यानंतरच पहिल्या टप्प्यात तब्बल 2क्क् वाहतूक मार्शल नेमण्यात येणार आहेत. त्यांच्याकडूनच पार्किगची फी वसूल केली जाणार आहे. तसेच या मार्शलच्या जोडीलाच दुस:या टप्प्यात पार्किगच्या ठिकाणी येणा:या वाहनचालकांना त्या ठिकाणी पार्किगची जागा उपलब्ध आहे अथवा नाही, याची माहिती मोबाइलच्या एका क्लिकवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच पार्किगच्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक बोर्ड लावण्यात येणार आहेत.
 
महिनाकाठी खर्च 8क् लाखांच्या आसपास 
पार्किग धोरण अमलात येण्यासाठी सुमारे 4 कोटींचा खर्च अपेक्षित असून महिनाकाठी वाहतूक मार्शल मेंटनन्स आणि इतर खर्च हा 8क् लाखांच्या आसपास धरण्यात आला आहे. परंतु, पार्किगच्या माध्यमातून महिन्याला 1 कोटीच्या आसपास उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे.