Join us  

२६ ठिकाणी पार्किंग तरीही गैरसोय कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 4:08 AM

श्रेणी ए करिता व्यापारी संकुल, रेल्वे स्थानक येथील पार्कींचे दर - तीन चाकी व चार चाकी पार्किंगसाठी प्रत्येक तासाला ६० रुपये आहे़

मुंबई : महापालिकेने मुंबईतील पाार्किंगला शिस्त लावण्यासाठी सुरू केलेली दंडात्मक कारवाई वादाचे कारण ठरले आहे. या कारवाईद्वारे थेट दहा हजार रुपये दंड करण्यात येत असल्याने वाहन मालकांमध्ये नाराजी आहे. वाहनांच्या तुलनेत पार्किंगची सुविधा नसल्याने वाहने उभी करणार कुठे? असा संतप्त सवाल केला जात आहे. पालिकेने २६ ठिकाणी सार्वजनिक पार्किंगची सोय केली आहे. मात्र तेथेही जागा मर्यादित असल्याने वाहन चालकांची गैरसोय होत आहे.

श्रेणी ए करिता व्यापारी संकुल, रेल्वे स्थानक येथील पार्कींचे दर - तीन चाकी व चार चाकी पार्किंगसाठी प्रत्येक तासाला ६० रुपये आहे़ यामध्ये १ ते ३ पर्यंत ७५, ३ ते ६ पर्यंत १०५, ६ ते १२ पर्यंत १८० आणि रात्री १२ नंतर २१० रुपये दर आहेत. तर दुचाकीसाठी हेच दर दुपारी १ वाजेपर्यंत १५, १ ते ३ पर्यंत ४५, ३ ते ६ पर्यंत ६०, ६ ते १२ पर्यंत ७५ आणि रात्री १२ नंतर ९० रुपये आहेत.

श्रेणी बी करिता निवासी आणि व्यावसायिक इमारतींच्या परिसरात - तीन चाकी व चार चाकीसाठी १ ते ३ पर्यंत ५०, ३ ते ६ पर्यंत ७०, ६ ते १२ पर्यंत १२० आणि रात्री १२ नंतर १४० रुपये तर दुचाकीसाठी हेच दर दुपारी १ वाजेपर्यंत १०, १ ते ३ पर्यंत ३०, ३ ते ६ पर्यंत ४०, ६ ते १२ पर्यंत ५० आणि रात्री १२ नंतर ६० रुपये आहेत.

श्रेणी सी करिता निवासी क्षेत्रासाठी तीन व चारचाकी वाहनांसाठी १ ते ३ पर्यंत २५, ३ ते ६ पर्यंत ३५, ६ ते १२ पर्यंत ६० आणि रात्री १२ नंतर ७० रुपये दर तर दुचाकीसाठी १ वाजेपर्यंत पाच रुपये, १ ते ३ पर्यंत १५, ३ ते ६ पर्यंत २०, ६ ते १२ पर्यंत २५आणि रात्री १२ नंतर ३० रुपये असणार आहेत.

टोपीवाला सेंटर, टोपीवाला मार्केट इमारत, गोरेगाव रेल्वे स्थानकाजवळ, गोरेगाव पश्चिम - कार, जीप - ११६ एरोमेला, विश्वेशर रोड, प्लॉट बिअरिंग सीटीएस क्रमांक १७५/४, ५ पहाडी गाव, गोरेगाव पूर्व - कार- २९८, जड वाहने ८, - एलोढा गोरेगाव, हब मॉलजवळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव पूर्व. कार ९८२, तीन चाकी २०, जड वाहनं- २१ (विनामूल्य) - बीट्रायोस फशन मॉल, वांद्रे गाव, हिल रोड जंक्शन, आईस फक्टरी लेन- कार, जीप- ९२...एसीटीएस क्रमांक १४४८/८ अ आणि १४४८/८ ऊ, एक्सर गाव, देविदास लेन, बोरिवली प. - कार, जीप - १६८, तीन चाकी २६, विनामूल्य एअल्ट्रास्पेस, कालिना, सांताक्रूझ पूर्व - कार, जीप - ४०९. एसीटीएस क्र. ५४४२-इ, कोल्हेकल्याण गाव, सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूज पूर्व - कार, जीप - ८०. एरूणवाल ओशिवरा गाव, ओशिवरा जोड रस्ता. अंधेरी प. - कार ४५०, तीन चाकी- ६५. विनामूल्य. एमहापालिका वाहनतळ, सीटीएस क्रमांक ८३३/१५, जय प्रकाश रोड, ओशिवरा मेट्रो स्थानकाजवळ, अंधेरी पश्चिम - कार - १४४. विनामूल्य - एलोढा एक्सेल्स, अपोेलो मिल कंपाऊंड, लोअर परळ- कार - ८१७, जड वाहन -३०. बीलोढा दि पार्क, मुंबई मिल, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ - कार, जीप - ४३२८, जड वाहनं - २३७ विनामूल्य. एकल्पतरू अवाना, प्लॉट बिअरिंग सीएस क्रमांक १/२९६, परळ, शिवडी विभाग-दुचाकी - ५१२, कार - ५५३, ...सीरहेजा, वरळी स्कीम नंबर ५२, लोअर परळ, कार - ७९४, तीन चाकी ०९. बीलोढा दि वर्ल्ड टॉवर्स, श्रीनिवास कॉटन मिल, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ. कार - ३८५६. विनामूल्य. बीवन इंडिया बुल्स, एल्फिस्टन रेल्वे स्थानकजवळ, ज्युपिटर मिल, सेनापती बापट मार्ग लोअर परळ - कार - २३७०. बीइंडिया बुल्स फायनान्स सेंटर, एलफिस्टन मिल, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ - कार - ८९०, तीन चाकी - ४१५, जड वाहनं १२. (विनामूल्य). बीलोढा अल्टामाऊंट रोड, मलबार हिल विभाग, अल्टामाऊंट रोड, कार - २०४. एसिलेस्टिया इमारत, टोकरशी जीवराज मार्ग, शिवडी - कार १६६, तीन चाकी ७५, जड वाहनं ३६. विनामूल्य. एरूणवाल कंबाला हिल, रूईया बंगला, नेपियन्सी रोड - कार - ५७. एमुलुंड गाव, मुलुंड पश्चिम, (विकास प्लाझो इमारत), जंक्शन आॅफ पंडित जवाहरलाल आणि मदनमोहन मालविया रोड - कार - १२५ (विनामूल्य) - एब्युमबर्ग इमारत, चांदिवली गावाजवळ, कुर्ला पश्चिम कार - १६१, जड वाहन १३. एरूणवाल ग्रीन्स, नाहूर गाव, मुलुंड-गोरेगाव रोड, नाहूर - कार - ११५२, जड वाहन ११७. सीलोढा सुप्रीम, कांजूर गाव, कांजूर मार्ग पूर्व, कार ४०२. बीमहापालिका वाहनतळ पवई तुंगवे गाव, साकी विहार मार्ग, पवई - कार - १८५. एरूणवाल डव्हल्पर्स, मुलुंड गाव, एलबीएस मार्गजवळ कार - ४८०, तीन चाकी - ३०- बीवाधवा ग्रुप, एलबीएस मार्ग, आर सीटी मॉलजवळ, विक्रोळी गाव, विक्रोळी (विनामूल्य) - कार ८२४, तीन चाकी ३६, जड वाहन १३ - बी

टॅग्स :पार्किंगकार