Join us  

पालकांनो... सावधान तुमची मुले भरकटताहेत!

By मनीषा म्हात्रे | Published: February 21, 2018 2:09 AM

‘परीक्षेत कमी गुण मिळाले, अभ्यासाचा कंटाळा आलाय, आई ओरडली, नशा करायचीय... अशा क्षुल्लक कारणांमुळे अल्पवयीन मुले घर सोडत असल्याचे धक्कादायक वास्तव गेल्या

मनीषा म्हात्रे मुंबई : ‘परीक्षेत कमी गुण मिळाले, अभ्यासाचा कंटाळा आलाय, आई ओरडली, नशा करायचीय... अशा क्षुल्लक कारणांमुळे अल्पवयीन मुले घर सोडत असल्याचे धक्कादायक वास्तव गेल्या महिनाभरात मुंबईत घडलेल्या घटनांनी समोर येत आहे. यातील काही मुले परतली, तर अजूनही काही भरकटलेल्या मुलांचा शोध सुरू आहे.दिवसाला ३ ते ४ मुलींचे अपहरण होत असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या दफ्तरी दाखल झालेल्या आकडेवारीतून समोर येते. गेल्या वर्षी मुंबईत १ हजार २७४ मुलींच्या अपहरणाची नोंद झाली. पैकी १ हजार ८७ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले; तर ४६७ मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार ठरल्या आहेत. या वर्षी जानेवारी महिन्यात १२२ मुलींचे अपहरण झाले, तर ४१ अल्पवयीन मुली विकृत वासनेच्या शिकार ठरल्या. एकीकडे या घटनांवर आवर घालण्याचे आव्हान असतानाच क्षुल्लक कारणावरून घर सोडून जात असलेल्या मुलांची या आकडेवारीत भर पडत आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच पालकांनीही याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.विभक्त कुटुंब पद्धती. त्यात आपल्या पाल्याला सर्व सुखसोयी देण्याच्या प्रयत्नात त्याला नेमके काय देणे गरजेचे आहे, हेच पालक विसरत आहेत. कुठेतरी अतिलाडामुळे मुलांना ‘नाही’ ऐकण्याची सवय राहत नाही, तर अतिदबावामुळे पालकांबद्दल एक वेगळा समज, भीती त्यांच्यात निर्माण होते. एखादी वस्तू मिळाली नसल्यास किंवा अन्य काही क्षुल्लक कारणातून ही मुले बाहेरच्या जगात मुक्त वावरणे पसंद करतात, असे मानसोपचारतज्ज्ञ सागर मुंदडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दोन वेळा राहुलने घर सोडले. मस्तीखोर, घर सोडणारा असे हिणवून पालकांनी त्याला खडसावले आणि मारही दिला. तो ऐकत नाही म्हणून त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे नेले. त्याच्या चौकशीत आई-वडिलांमधील भांडणातून सुटका करून घेण्यासाठी तो घराबाहेर पडतो, हे सत्य समोर आले. त्याचे समुपदेशन करण्यात आले. त्याचबरोबरीने पालकांनाही समजावले.आई-वडिलांच्या वागणुकीत झालेल्या बदलानंतर गेल्या दीड वर्षापासून राहुल त्यांच्यासोबत आनंदाने वावरत आहे. त्यामुळे अशा प्रकरणात पालकांची भूमिका महत्त्वाची आहे, असेही मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.अशाही घटना...१७ जानेवारी - गेल्या पाच वर्षांपासून जन्मदात्याकडूनच सुरू असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून १६ वर्षीय मुलीने घर सोडले. तीन दिवसांनंतर विक्रोळी पोलिसांनी तिचा शोध घेतला. तिच्या चौकशीत ही बाब उघड होताच पोलिसांनाही धक्का बसला. या प्रकरणी पार्क साईट पोलिसांनी तिच्या वडिलांना लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केली.१० फेब्रुवारी - आजी, मला परीक्षेत कमी मार्क मिळाले म्हणून घर सोडून जातो, अशा आशयाची चिठ्ठी लिहून सोपान काळभोर (५८) यांच्या दोन अल्पवयीन नातवंडांनी घर सोडले. त्यांच्यासह त्यांचा १६ वर्षांचा नातेवाईकही निघून गेला. या प्रकरणी दहिसर पोलीस अधिक तपास करत आहेत.१० फेब्रुवारी - चौथीत असल्यापासून नशेचे व्यसन लागले. ही बाब कुटुंबीयांना समजताच त्यांनी तिला घरात कोंडले. नशेसाठी १५ वर्षांच्या व्यसनाधीन मुलीने दोन वेळा घर सोडले. मात्र, या वेळेस दोन दिवसांनी ती घरी परतली. भोईवाडा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.१२ फेब्रुवारी - अभ्यास नको म्हणून चौथी इयत्तेत शिकणाºया मुलीने तिसºयांदा घर सोडले. घटनेच्या तीन दिवसांनंतर मुलगी परतली. पहिल्यांदा घर सोडून गेल्यानंतर दोन दिवसांनी ती बोरीवली रेल्वे स्थानकात फुले विकताना दिसली होती.काय करू नये?मुलाच्या चैनीसाठी जास्तीचे पैसे देणे बंद करा, पाल्याचे सर्व हट्ट पुरवू नकारागाने घर सोडून तो पुन्हा घरी परतल्यास रागवू नये. त्याला समजून घ्या.\काय करावे?मुलाचे अतिलाड करणे टाळापाल्यासोबत संवाद साधा, मैत्री करा, पाल्याच्या सर्व हालचाली आणि बदलांकडे गांभीर्यपूर्व लक्ष द्या, पाल्याला योग्य-अयोग्य गोष्टींची वेळोवेळी जाण करून द्या.पालकांनी आत्मचिंतन करणे गरजेचे, प्रकरण गंभीर वाटत असल्यास मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशकाची मदत घ्या.सारखे घर सोडणे आजारपणाचे लक्षण -जर एखादे मूल वारंवार घर सोडत असेल तर हे मानसिक आजारपणाचे लक्षण आहे. या आजारात मुले नेहमीच पालक सांगतात त्याच्याविरुद्ध वागतात. अशा प्रकरणात पालकांनी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेण्याची गरज असल्याचेही सागर मुंदडा यांनी सांगितले.अशीही भीती... : घराबाहेर पडल्यास अनेक मुलं विकृत वासनेची शिकार ठरतात. बाहेरील जग त्यांना आपलेसे वाटते. यामध्ये त्यांच्या अपहरणाबरोबरच लैंगिक अत्याचार तसेच अन्य कामकाजासाठीही या मुलांचा वापर केला जाऊ शक तो. त्यामुळे त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.