Join us  

परप्रांतीय मच्छीमारांना लोकप्रतिनिधींचे अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 2:03 AM

मासे विक्री व्यवसायात परप्रांतीयांचा हस्तक्षेप वाढल्याने मुंबईतील भूमिपुत्रांचा मासे विक्रीचा व्यवसाय मंदावला आहे.

मुंंबई : मासे विक्री व्यवसायात परप्रांतीयांचा हस्तक्षेप वाढल्याने मुंबईतील भूमिपुत्रांचा मासे विक्रीचा व्यवसाय मंदावला आहे. मागील १५ ते २० वर्षांमध्ये येथे परप्रांतीयांची संख्या वाढली असून, राजकीय अभय असल्याने त्यांचे वर्चस्व वाढत असल्याचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून सांगण्यात आले.परप्रांतीय नागरिक अनधिकृतरीत्या ठेले, हातगाड्या लावून किंवा दारोदारी फिरून मासे विकत आहेत. त्यामुळे महापालिकेने मासे विक्रीसाठी उभारलेल्या मासळी बाजाराकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. ग्राहक नसल्याने महिला मासे विक्रेत्यांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. पालिकेच्या ४१० कलमाचे परप्रांतीय मासे विक्रेते उल्लंघन करत आहेत. या कलमानुसार मासळी बाजाराशिवाय इतर कुठेही मासे विक्री करू नये, मासे कापण्यासाठी लागणाऱ्या हत्यारांचा वापर केवळ मासळी बाजारात केला जावा. मात्र, या नियमांचे पालन परप्रांतीय मच्छीमार करताना दिसत नाहीत. त्यामुळे पालिकेकडूनआणि पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या अध्यक्षा नैना पाटील यांनी केली आहे.१० वर्षांपूर्वी परप्रांतीय मासे विक्रीमध्ये घुसखोरी करत असल्याचे जाणवल्याने मोर्चे, आंदोलनेकरण्यात आली. या वेळी समस्या सोडविण्याचे आश्वासन राजकीय नेत्यांनी दिले होते, मात्र प्रत्यक्ष कोणतीच कृती झाली नसल्याने परप्रांतीयांचा विषय प्रलंबित असल्याचे मासे विक्रेत्या महिलांकडून सांगण्यात आले.>स्थानिक मच्छीमार कर्जबाजारीपावसाळ्यात मासेमारीसाठी मज्जाव केला जातो. त्या वेळी प्रजनन काळ असल्यामुळे मासेमारी केली जात नाही. तेव्हा परप्रांतीय लोक आपल्या गावाला जाऊन शेती करतात. पावसाळा गेल्यानंतर मासेमारीच्या काळात परप्रांतीय लोक मुंबईत येऊन मासे विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे मुंबईच्या आद्य रहिवाशांना मासे विक्री व्यवसायातून जास्त रोजगार मिळत नाही. पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने आणि पावसाळ्यानंतर व्यवसाय मंदी असल्याने अनेक भूमिपुत्र कर्जबाजारी झाले आहेत.>महिलांची संख्या अधिकमुंबई शहर आणि उपनगरात महापालिकेचे एकूण १०८ मासळी बाजार आहेत; तर ५५ मासळी बाजार खासगी आहेत. मासे विक्री व्यवसायात पुरुषांपेक्षा महिला जास्त आहेत. मुंबईत एकूण ३० हजार महिला मासे विक्रेत्या असून पुरुष २ ते ३ हजार आहेत. अंधेरीतील मासळी बाजार सर्वात मोठा असून येथे ६०० ते ७०० महिला मासे विक्रेत्या बसतात. प्रत्येक मासळी बाजारामध्ये भूमिपुत्रांची चौथी पिढी काम करत आहे.

टॅग्स :मच्छीमार