Join us  

पारा चाळीशी : महाराष्ट्र तापतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 3:52 PM

मुंबईसह राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे

पारा चाळीशी : महाराष्ट्र तापतोय

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्च महिन्याच्या अखेरीस आता मुंबईसह महाराष्ट्र तापू लागला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३८ अंश नोंदविण्यात येत असून, मुंबईचे कमाल तापमान देखील ३६ अंश नोंदविण्यात येत आहे. किमान आणि कमाल अशा दोन्ही तापमानात वाढ नोंदविण्यात येत असल्याने नागरिकांना आता उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपुर्ण राज्यांत कमाल तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. जळगाव ३९, पुणे ३७.६, सांगली ३८, सोलापूर ३९.६, बीड ३९.२, अकोला ४०.३ अमरावती ३९.४ या शहरात कमाल तापमान सर्वाधिक नोंदविण्यात आले आहे. मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. कमाल तापमान ३६ तर किमान तापमान २२ अंश नोंदविण्यात येत आहे.

राज्याचा विचार करता पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात मोठे बदल होतील. विशेषतः ठिकठिकाणी तापमानात आणखी वाढ नोंदविण्यात येईल. शिवाय अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय गारांचा पाऊस देखील पडेल.

दरम्यान, कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई ठप्प झाली आहे. येथील वाहतूक व्यवस्था बंद आहे. आता तर लोकल देखील बंद झाली आहे. या शिवाय कारखाने, उद्योग बंद आहे. बांधकामे देखील बंद आहेत. त्यामुळे वातावरणात धुळीचे प्रमाण कमी आहे. धूर, धुके आणि धूळ यांचे प्रमाण कमी झाल्याने मुंबईवरचे धुरके देखील हटले आहे. याचा परिणाम म्हणून मुंबईची हवा स्वच्छ नोंदविण्यात येत आहे.

टॅग्स :तापमानमुंबई