Join us  

पेपरफुटी; ‘किड्स पॅराडाइज’च्या मुख्याध्यापकाला होणार अटक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 2:21 AM

अंधेरी येथील शाळेत दहावीच्या आयसीटी पेपर फुटी प्रकरणात, अटक केलेल्या मुंब्रा येथील किड्स पॅराडाइज स्कूलचा उपमुख्याध्यापक फिरोज खान याच्या नियुक्तीचे अधिकृत पत्रच नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे.

मुंबई : अंधेरी येथील शाळेत दहावीच्या आयसीटी पेपर फुटी प्रकरणात, अटक केलेल्या मुंब्रा येथील किड्स पॅराडाइज स्कूलचा उपमुख्याध्यापक फिरोज खान याच्या नियुक्तीचे अधिकृत पत्रच नसल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. त्यामुळै या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापक झाकिया मोहम्मद हुसेन शेख यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.दहावीचा गुरुवारी झालेला ‘आयटीसी’चा पेपर फुटला होता. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अटक केलेला फिरोज गेले दहा महिने शाळेत कार्यरत आहे. त्याच्याकडे अधिकृत नियुक्तीपत्र नाही, तरीही त्याला पेपरचे ‘सील’ उघडण्याचा अधिकार दिला होता. त्यामुळे याला मुख्याध्यापक शेखही जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांनाही अटक केली जाईल, असे तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. साकीनाका पोलीसही या प्रकरणाची चौकशी करत असल्याचे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :अटक