Join us  

पानसरे हत्याप्रकरण : उत्तर देण्यास सरकारने मागितली मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 5:09 AM

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी समीर गायकवाडच्या जामिनाविरुद्ध राज्य सरकारसह पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

 मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणातील आरोपी समीर गायकवाडच्या जामिनाविरुद्ध राज्य सरकारसह पानसरे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उत्तर देण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाकडून मुदत मागितली आहे.१६ फेब्रुवारी २०१५ रोजी झालेल्या गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी २०१५ मध्येच गायकवाडला अटक करण्यात आली होती. याबाबत सुरू असलेल्या खटल्यादरम्यान १७ जून रोजी सत्र न्यायालयाने गायकवाडची जामिनावर सुटका केली. त्यामुळे राज्य सरकारसह पानसरे यांची मुलगी व सुनेने उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गेल्या सुनावणीत दिले होते. मात्र, मंगळवारच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी उत्तर देण्यासाठी न्या. टी. व्ही. नलावडे यांच्याकडे मुदत मागितली. त्यावर न्यायालयाने यांनी सरकारला २४ आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे.