पान १...अँकर....रस्त्यांच्या कामांना शिवसेनेचे प्रशस्तीपत्रक
By admin | Updated: March 6, 2015 23:07 IST
रस्त्यांच्या कामांना शिवसेनेचे प्रशस्तीपत्रक
पान १...अँकर....रस्त्यांच्या कामांना शिवसेनेचे प्रशस्तीपत्रक
रस्त्यांच्या कामांना शिवसेनेचे प्रशस्तीपत्रककमी बोलीच्या कंत्राटामुळे दर्जाबाबत साशंकतामुंबई : कमी बोलीच्या कंत्राटामुळे रस्ते दुरुस्तीच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त होत असताना शिवसेनेचे नेते मुंबईतील रस्त्यांच्या कामांना प्रशस्तीपत्रक देऊन मोकळे झाले आहेत़ बुधवारी रात्री पाहणी दौर्यात रस्त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत यंदाच्या पावसाळ्यात मुंबई खड्डेमुक्त करण्याची हमी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली़खर्चापेक्षा कमी बोली लावणार्या ठेकेदारांनाच कंत्राट देण्याचा सपाटा शिवसेना-भाजपा युतीने लावला आहे़ पावसाळ्यापूर्वीच रस्ते व खड्डे दुरुस्तीसाठी सात परिमंडळात प्रत्येकी २० कोटींच्या कंत्राटांची खैरात ५० टक्क्यांपर्यंत कमी खर्चात करणार्या ठेकेदारांना वाटण्यात आली़ विशेष म्हणजे अशा कंत्राटामुळे पालिकेच्या विश्वासार्हतेवर भाजपा सदस्याने प्रश्नचिन्ह उभे केले असताना बहुमताच्या जोरावर युतीने हे प्रस्ताव मंजूर केले़ त्याच रात्री आदित्य ठाकरे यांनी ए विभागात मरीन ड्राईव्ह, डी वॉर्डमध्ये ब्रीच कॅण्डी, भुलाभाई देसाई मार्ग, एफ दक्षिण- जी़डी़ आंबेकर मार्ग, एफ उत्तर-डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, खार पश्चिम या रस्त्यांची पाहणी केली़ या रस्त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत या कामांचा आनंद मुंबईकर ४० वर्षे घेतील, असा दावा ठाकरे यांनी केला़ या दौर्यात महापौर स्नेहल आंबेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)....................................(पॉइंटरर्स)* मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी तीन वर्षांचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे़ त्यानुसार साडेसात हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़* पावसाळ्यापूर्व रस्त्यांच्या कामांसाठी सात परिमंडळाकरिता प्रत्येकी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे़* २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपये पावसाळापूर्व व पावसाळ्यातील रस्ते दुरुस्तीवर खर्च करण्यात आली़* रस्त्यांच्या डागडुजीसाठी दोन कोटींची कामे नुकतीच मंजूर करण्यात आली आहेत़ मात्र रस्त्यांची कामे पालिकेच्या अंदाजित खर्चापेक्षा निम्म्या खर्चात करण्यास तयार ठेकेदारांना देण्यात येत आहेत़ त्यामुळे कालांतराने वाढीव बिले सादर करणे अथवा निकृष्ट दर्जाचे काम हे ठेकेदार करीत असतात़ * आजच्या घडीला १३०० ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत़ यापैकी ५३५ रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत़