Join us  

मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना १ कोटी ३५ लाखांचे पॅकेज; १० दिवसांत २०० कंपन्यांकडून ७९५ विद्यार्थ्यांना मिळाली आॅफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 5:35 AM

आयआयटी मुंबईमध्ये सुरू असलेल्या प्लेसमेंट सीझनमध्ये पहिल्या १० दिवसांत तब्बल ७९५ विद्यार्थ्यांना नोकºया मिळाल्या आहेत. त्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीने येथील ६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ लाख १० हजार यूएस डॉलर म्हणजेच, सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या वार्षिक पगाराची आॅफर दिली आहे.

मुंबई : आयआयटी मुंबईमध्ये सुरू असलेल्या प्लेसमेंट सीझनमध्ये पहिल्या १० दिवसांत तब्बल ७९५ विद्यार्थ्यांना नोक-या मिळाल्या आहेत. त्यात मायक्रोसॉफ्ट कंपनीने येथील ६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ लाख १० हजार यूएस डॉलर म्हणजेच, सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांच्या वार्षिक पगाराची आॅफर दिली आहे.आयआयटीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधीत १८० कंपन्यांनी ७७५ विद्यार्थ्यांना नोकºयादिल्या होत्या. यंदा त्यात वाढ झालीअसून, सुमारे २०० कंपन्यांनी ७९५ विद्यार्थ्यांना नोकºया दिल्या आहेत. त्यात सुमारे ६५ परदेशी कंपन्यांचा समावेशआहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यामध्ये आणखी ५०हून अधिक कंपन्यांची वाढ होण्याची शक्यताही आयआयटीने व्यक्त केली आहे.संधीचे प्रमाण वाढतेय...द ब्लॅक स्टोन ग्रुपने एका विद्यार्थ्याला ४५ लाख रुपयांच्या नोकरीची आॅफर दिली आहे, तर वर्ल्ड क्यंूट रिसर्च या कंपनीनेतीन विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी ३९ लाख रुपयांची नोकरी दिली आहे.बीटेकच्या पदवीपूर्व ६० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनाआणि एमटेकच्या ५० टक्के विद्यार्थ्यांना याआधीच नोकरी मिळालेली आहे.देश-परदेशात ४५ विद्यार्थ्यांना नोक-यानोक-या देण्यामध्ये सॅमसंग कंपनीने पुढाकार घेतला असून, देशात आणि परदेशात मिळून कंपनीने एकूण ४५ विद्यार्थ्यांना संधी दिली आहे. त्यापाठोपाठ इंटेल, गोल्डमॅन सॅच, मायक्रोसॉफ्ट, बीटॅक, एमटॅक या कंपन्यांचा समावेश आहे.मायक्रोसॉफ्ट कंपनीशिवाय उबर या कंपनीनेही एका विद्यार्थ्याला अमेरिकेत काम करण्यासाठी वर्षाला ९६ लाख ५३ हजार रुपये देऊ केले आहेत, तर आॅप्टिव्हर कंपनीनेही अ‍ॅम्स्टरडॅममध्ये काम करण्यासाठी ३ विद्यार्थ्यांना वर्षाला प्रत्येकी ७५ लाख रुपयांच्या पॅकेजची आॅफर दिली आहे.

टॅग्स :नोकरी