Join us  

पी अँड डब्ल्यू इंजिन वाहतुकीस योग्य आहे का? - उच्च न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:43 AM

‘प्रॅट अँड व्हिटनी’ या कंपनीचे ११०० इंजिन वाहतुकीस योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी काय पावले उचललीत, याची माहिती सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने नागरी विमान उड्डाण महासंचलनालया(डीजीसीए)ला शुक्रवारी दिले.

मुंबई : ‘प्रॅट अँड व्हिटनी’ या कंपनीचे ११०० इंजिन वाहतुकीस योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी काय पावले उचललीत, याची माहिती सादर करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने नागरी विमान उड्डाण महासंचलनालया(डीजीसीए)ला शुक्रवारी दिले.युरोपीयन एअर सेफ्टी आॅथॉरिटी (इएएसए) पी अँड डब्ल्यू ११०० इंजिनाचे ४५० व त्यापुढील सीरिजचे विमान न चालविण्याचे दिलेल्या निर्देशांचे पालन करणे, हे पुरेसे नाही. सर्व प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल, याची काळजी घेण्याचे काम डीजीसीए व केंद्र सरकारचे आहे, असे न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.‘तुम्ही (डीजीसीए) केवळ इएएसएने दिलेल्या निर्देशांवर व प्रमाणपत्रांवर आधारित आहात की, याबाबत स्वत:ही काही अभ्यास केला आहात? इएएसएने ज्या विमानांचे उड्डाण रद्द करण्यास सांगितले, त्या व्यतिरिक्त अन्य इंजिनांची विमानेही वाहतूक करण्यास योग्य आहेत की नाही, याबाबत अभ्यास केला का,’ असा प्रश्न न्यायालयाने शुक्रवारच्या सुनावणीत उपस्थित केला.ज्या विमानांचे उड्डाण रद्द केले आहे, ती विमानाने वाहतुकीसाठी वापरली जाणार नाहीत आणि विमानाने प्रवास करणे सुरक्षित आहे, हे नागरिकांना सांगावे लागेल. प्रवाशांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी यंत्रणा नेमा, असे निर्देश उच्च न्यायालयाने डीजीसीएला दिले.पी अँड डब्ल्यू ११०० इंजिनच्या ४५० व त्यापुढील सीरिजमधील इंजिन असलेली विमाने वाहतुकीसाठी रद्द करण्यात आल्याची माहिती, इंडिगोतर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी न्यायालयाला दिली. मात्र, तरीही प्रवासी संबंधित विमानात पी अँड डब्ल्यूचे इंजिन नाही ना, असा प्रश्न करत असल्याचे द्वारकादास यांनी न्यायालयाला सांगितले. याला डीजीसीए जबाबदार आहे. कारण ते प्रवाशांच्या शंकांचे निरसन करत नाही, असेही द्वारकादास यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने वरील निर्देश डीजीसीएला दिले.गो-एअर, इंडिगो या एअरलाइन्स यूएसच्या ‘प्रॅट अँड व्हिटने (पीडब्ल्यू) इंजिन’चा वापर ए ३२० निओ विमानांसाठी करतात. मात्र, या कंपनीचे ‘पीडब्ल्यू ११००’ इंजिनमध्ये दोष आहे. पीडब्ल्यू ११०० मधील ४४९, ४५० व त्यापुढील सीरिजमधील इंजिनांमध्ये दोष असल्याचे, खुद्द यूएस सरकार व डीजीसीएने मान्य केले आहे. त्यामुळे गो-एअर व इंडिगोला ही इंजिन बसविण्यात आलेली सर्व विमानांची सेवा मागे घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिका मुंबईतील रहिवासी हरीश अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.प्रतिज्ञापत्र सादर कराडीजीसीएचे वकील अद्वैत सेठना यांनी ४५०च्या सीरिजच्या आधीची सीरिजची इंजिन वाहतुकीसाठी सुरक्षित असल्याचे न्यायालयाला सांगितले.त्यावर न्यायालयाने इंडिगो, गो-एअर, डीजीसीएला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आखण्यात आलेल्या सर्व उपाययोजनांसंदर्भात २ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :न्यायालय