Join us  

चुनाभट्टीतील पुलावर वर्षभरातच हातोडा, रेल्वेच्या भूमिकेवर स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 2:29 AM

मुंबई : इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, चुनाभट्टी ते वांद्रे-कुर्ला संकूल यांना जोडणारा बीकेसी एलिव्हेटेड कनेक्टरचे काम वेगाने सुरू आहे.

मुंबई : इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, चुनाभट्टी ते वांद्रे-कुर्ला संकूल यांना जोडणारा बीकेसी एलिव्हेटेड कनेक्टरचे काम वेगाने सुरू आहे. या कामाला अडथळा ठरत असल्याने जेमतेम वर्षभरापूर्वी कार्यान्वित करण्यात आलेल्या चुनाभट्टी स्थानकातील पादचारी पूल तोडण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडे पादचारी पूल बांधण्यात आला होता. बीकेसी कनेक्टरच्या कामामुंळे या पूलावर हातोडा चालवण्याची वेळ आली आहे. मुळात बीकेसी कनेक्टरचा मार्ग माहित असून ही त्याच मार्गावर रेल्वेने पादचारी पूल उभारला. या बाबत रेल्वेच्या अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी माहिती घेऊन बोलू,अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे रेल्वेच्या कामकाजांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.बीकेसी कनेक्टरमुळे मुंबईकरांची ट्रॅफिकची समस्येतून सुटका होणार आहे. या एलिव्हेटेड कनेक्टरमुळे इस्टर्न एक्स्प्रेसवे चुनाभट्टी येथून थेट बीकेसी येथे जाण्याचा पर्याय खुला होणार आहे. या पूलासाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कनेक्टरसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) रेल्वेच्या अखत्यारित असलेल्या परवानग्यांसाठी फाईल सादर करण्यात आली होती. अडीच वर्षांपूर्वी रेल्वेकडून या कामासाठी मंजूरी देण्यात आली. बीकेसी कनेक्टरचा मार्ग माहित असून देखील रेल्वे प्रशासनाने चुनाभट्टी स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेला पादचारी पूल बांधला. हा पूल बीकेसी कनेक्टरसाठी अडथळा ठरत असल्याचे समजताच संबंधित कंत्राटदाराने हा पूल तोडण्याचे आदेश दिले आहेत. हा पूल तोडून सीएसएमटी दिशेला नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे, असे प्रत्यक्ष काम करणाºया अभियंत्याचे म्हणणे आहे.रेल्वे प्रशासनाने स्वत: मंजूरी दिलेल्या ‘बीकेसी कनेक्टरला’ अडथळा निर्माण होईल, अशा ठिकाणी पादचारी पूल बांधल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. चुनाभट्टी स्थानकातील पादचारी पूल तोडल्याशिवाय बीकेसी कनेक्टरचे पुढील काम अशक्य आहे. सद्यस्थितीत चुनाभट्टी स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला बीकेसी कनेक्टरचे खांब तयार झालेले आहेत. या बाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी माहिती घेण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.रेल्वे प्रशासन-एमएमआरडीएत समन्वय नाहीरेल्वे प्रशासन आणि एमएमआरडीए यांच्यात कोणताही समन्वय नाही. मुळात रेल्वे प्रशासनाला बीकेसी कनेक्टरचा मार्ग माहीत असूनही ‘कनेक्टर’ला अडथळा ठरेल अशा ठिकाणी पूल का उभारण्यात आला? पूल उभारण्याआधीच याबाबत दक्षता घेतली असती तर पूल तोडण्यावर होणारा खर्च रोखता आला असता.अडीच वर्षांपूर्वी बीकेसी कनेक्टरला परवानगी मिळाली आणि वर्षभरापूर्वी पादचारी पूल बांधण्यात आला. रेल्वेच्या अधिकाºयांच्या गलथान कारभारामुळे जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याचा आरोप अभय अविनाथ थळी या स्थानिकाने केला आहे.या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करण्याची मागणीदेखील स्थानिकांकडून होत आहे.

टॅग्स :मुंबई