Join us

एसटीतील ३,३२१ पैकी २,७४० कर्मचारी कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST

आतापर्यंत ३ हजार ३२१ बाधित : ९२ जणांनी गमावला जीवलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात एसटी महामंडळाच्या ३६ ...

आतापर्यंत ३ हजार ३२१ बाधित : ९२ जणांनी गमावला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात एसटी महामंडळाच्या ३६ विभागांत २५ नोव्हेंबरपर्यंत एकूण ३ हजार ३२१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यापैकी २,७४० कर्मचारी पूर्णपणे बरे होऊन कामावर परतले आहेत. ४८९ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून ९२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.

ठाणे विभागात करोनाने मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या विभागातील २५० कर्मचाऱ्यांना काेरोनाची लागण झाली होती. यापैकी १७५ कर्मचारी पूर्णपणे बरे झाले तर ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. महामंडळातील सर्वाधिक काेरोनाबाधित कर्मचारी सांगली आणि सोलापूर विभागात आहेत. सांगली आणि सोलापूर विभागात अनुक्रमे ३८६ आणि ३०२ काेरोनाबाधित आहेत.

...........................