Join us  

‘...अन्यथा कचरा उचलणे बंद करू’

By admin | Published: April 23, 2016 2:33 AM

ओला व सुका कचरा स्वतंत्र नेण्यासाठी पालिकेकडे वाहन नसल्याने ही मोहीम फसल्याची टीका आतापर्यंत होत होती़ मात्र कचरा वेगवेगळा उचलण्यासाठी नवीन ४१० वाहने खरेदी करण्याचा

मुंबई : ओला व सुका कचरा स्वतंत्र नेण्यासाठी पालिकेकडे वाहन नसल्याने ही मोहीम फसल्याची टीका आतापर्यंत होत होती़ मात्र कचरा वेगवेगळा उचलण्यासाठी नवीन ४१० वाहने खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे़ त्यामुळे आता कचऱ्याचे वर्गीकरण न करणाऱ्या निवासी सोसायट्यांचा कचरा उचलणार नाही, असे संकेत पालिकेने दिले आहेत़ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्याचा नियम पालिकेने आणला खरा, मात्र कचरा वेगवेगळा उचलण्यासाठी पालिकेकडे व्यवस्थाच नव्हती़ म्हणून ओला व सुका कचरा एकत्रच डम्पिंग ग्राउंडवर जात होता़ याबाबत सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठल्यानंतर पालिकेने अखेर नवीन वाहने घेण्याचा निर्णय घेतला आहे़ यापैकी २०० वाहनांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे़ गेल्या काही दिवसांपासून स्थानिक संस्थाच्या मदतीने पालिकेतर्फे ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे धडे नागरिकांना देण्यात येत आहेत. त्यानंतरही या मोहिमेला हरताळ फासणाऱ्या सोसायट्यांना प्रथम ताकीद देण्यात येईल़ त्यानंतर मात्र अशा सोसायट्यांमधून कचराच उचलणार नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले़ (प्रतिनिधी)