Join us  

वर्सोव्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; चौपाटीवर उभारले भव्य अयोध्या श्रीराम मंदिर

By मनोहर कुंभेजकर | Published: March 28, 2024 5:06 PM

अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा,सात बंगला येथे आठ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

मनोहर कुंभेजकर, मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा,सात बंगला येथे आठ दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. संत ज्ञानेश्वर सेवा मंडळाच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बीजोत्सवानिमित्ताने वर्सोवा सात बंगला येथील गणेश हनुमान मंदिरात काल दि,२७ मार्च ते दि,३ एप्रिल या कालावधीत हा सप्ताह साजरा होत आहे.काल दि,२७ मार्चला सकाळी समाजसेवक सचिन शिवेकर यांच्या हस्ते वीणा पूजनाने या हरिनाम सप्ताहाची सुरुवात झाली. 

आठ दिवस या ठिकाणी कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. शिवेकर यांच्या संकल्पनेतून वर्सोवा चौपाटीवर अयोध्या श्रीराम मंदिराचा देखावा देखील उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे भारतातील पहिल्या प्रसिद्ध महिला वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी या ठिकाणी समुद्राच्या वाळू पासून विठ्ठल पांडुरंगाचे वाळू शिल्प देखील उभारले आहे. अयोध्या मंदिर आणि विठ्ठल पांडुरंगाचे शिल्प पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची गर्दी होत आहे.

काल सकाळी या अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात विना पूजनाने करण्यात आली. शिवेकर यांच्या हस्ते वीणा पूजन करण्यात आल्यानंतर पहिल्या दिवशी मारुती महाराज पवार यांचे कीर्तन पार पडले. उर्वरित दिवसात महेश महाराज माकणीकर, राम महाराज कदम, तुकाराम महाराज रसाळ, हरिदास महाराज पालवे, किसन महाराज धंदरे, नितीन महाराज काकडे यांचे कीर्तन सेवा पार पडणार असून अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता राजाराम महाराज जगताप यांच्या कीर्तनाने होणार आहे.

टॅग्स :मुंबईवर्सोवा