"Order to stay in the Pragya Singh Sabha court" | ''प्रज्ञासिंहना कोर्टात हजर राहण्याचा आदेश द्यावा''
''प्रज्ञासिंहना कोर्टात हजर राहण्याचा आदेश द्यावा''

मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी आजारपणाच्या कारणावरून दिशाभूल करून जामीन मिळविला असल्याने त्यांना निवडणूक लढविण्यास मज्जाव करून खटल्याच्या सुनावणीस रोज हजर राहण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज येथील ‘एनआयए’ विशेष कोर्टात करण्यात आला आहे.
यावर कोर्टाने एनआयए व प्रज्ञासिंहना नोटीस काढली असून, पुढील सुनावणी सोमवारी होईल. प्रज्ञासिंहना भाजपने भोपाळमधून उमेदवारी दिली आहे. निस्सार अहमद सैयद बिलाल या मालेगाव दंगलीतील एकाने हा अर्ज केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोटांत ठार झालेल्या सहा जणांत बिलाल यांचा मुलगा सैयद अझरही होता.
उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेताना प्रज्ञासिंहनी आपणास स्तनाचा कर्करोग असून, आधाराशिवाय आपल्याला उभेही राहता येत नाही, असे म्हटले होते. साध्वी रिंगणात उतरल्याने त्यांनी दिशाभूल करून जामीन मिळविला, हेच स्पष्ट होते, असा आरोप करून बिलाल अर्जात म्हणतात की, प्रज्ञासिंहना जामीन मिळाला असला तरी सुनावणीस हजर न राहण्याची मुभा दिलेली नाही.


Web Title: "Order to stay in the Pragya Singh Sabha court"
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.