मुंबई : बेस्टच्या वीज विभागातील रिक्त पदे भरण्याचे आदेश बेस्टचे महाव्यवस्थापक जगदीश पाटील यांनी बॉम्बे इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनसोबत झालेल्या बैठकीत दिले आहेत. बेस्ट दिनाचे औचित्य साधत युनियनने महाव्यवस्थापकांची भेट घेतली. कामगारांच्या अडचणी विशद करीत त्या सोडविण्यात याव्यात, असे म्हणणे युनियनने मांडले होते.बेस्टच्या वीजपुरवठा विभागातील एकही पद गोठविण्यात येणार नाही. बेस्ट उपक्रमाच्या आगारामध्ये हजेरी लावताना त्याच कामगारांना समय नोंद कार्ड नोंद करावे लागेल. साप्ताहिक सुटी आणि सार्वजनिक सुटीदिवशी काम करणाऱ्या कामगारांना पर्यायी रजा दिली जाईल अथवा कामगारांच्या इच्छेप्रमाणे जादा वेळ कामाचे वेतन दिले जाईल, असे आश्वासन बेस्टकडून देण्यात आल्याचे युनियनच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
बेस्टच्या वीज विभागातील रिक्त पदे भरण्याचे आदेश
By admin | Updated: August 9, 2015 02:48 IST