Join us  

नालेसफाईवर विरोधक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 2:30 AM

राजकीय दौरे : मिठी नदी, धारावीतील नाल्यांची पाहणी

मुंबई : वायू चक्रीवादळामुळे बरसणाऱ्या सरींनीच मुंबईकरांची धावपळ उडवली आहे. मान्सून लवकरच सुरू होण्याची शक्यता असताना महापालिका मात्र अद्यापही पावसासाठी तयार नाही, अशी नाराजी विरोधी पक्षांकडून व्यक्त होत आहे. विशेषत: नालेसफाईच्या कामाची भाजपने पोलखोल केल्यानंतर आता महापालिकेतील विरोधी पक्ष काँग्रेसही नाल्यांच्या सफाईची पाहणी करणार आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा शुक्रवारी स्वपक्षीय नगरसेवकांबरोबर धारावी आणि मिठी नदी परिसराची पाहणी करणारआहेत.

लोकसभा निवडणुकीत महापालिकेचा कर्मचारीवर्ग मोठ्या प्रमाणात व्यस्त असल्याने मान्सूनपूर्व कामांना विलंब झाला. त्यामुळे ३१ मेपर्यंतची डेडलाइन संपली तरी पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू आहेत. यात प्रामुख्याने नालेसफाई आणि धोकादायक इमारतींवरील कारवाईचा समावेश आहे. नालेसफाईच्या कामाची गेल्या महिन्यात पाहणी करून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयुक्तांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर विरोधी पक्ष नेते रवी राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी नालेसफाईची पाहणी करून असमाधान व्यक्त केले होते.मात्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केलेल्या पाहणीनंतर नालेसफाईच्या कामांना वेग देण्यात आला. पावसाळ्याला लवकरच सुरुवात होणार आहे, मात्र अद्याप अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ दिसत असल्याची नगरसेवकांची तक्रार आहे. तर स्थानिक रहिवासी नाल्यात कचरा टाकत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. नाल्यांमध्ये गाळ तसाच राहिल्यास पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे नालेसफाईची पोलखोल करण्यासाठी पुन्हा राजकीय पाहणी दौरे सुरू झाले आहेत.च्२६ जुलै २00५ रोजी नाले भरल्याने मुंबईची तुंबापुरी झाली होती. त्यानंतर नालेसफाईचे गांभीर्य लक्षात येऊन पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात झाली.च् नालेसफाईच्या कामात ठेकेदार हात सफाई करीत असल्याचे उजेडात आल्यानंतर पालिका प्रशासनाने वर्षभर नालेसफाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात व नंतर अशा प्रकारे तीनवेळा नाल्यातील गाळ काढण्यात येतो.२४ विभागांसाठी विशेष पथकच्नाल्यांमध्ये स्थानिक रहिवासी कचरा टाकत असल्याचे आढळून आले आहे. अनेकवेळा ताकीद देऊनही नाल्यात कचरा टाकणे सुरूच असल्याने पोलिसांमार्फतच अशा लोकांवर कारवाई होणार आहे.च्यासाठी सर्व २४ विभागांसाठी प्रत्येकी एक पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांबरोबरच पोलीस दलातील प्रतिनिधींचाही समावेश असणार आहे.

३१ मेपर्यंतची डेडलाइन संपली तरी पावसाळापूर्व कामे संथगतीने सुरू आहेत. यात प्रामुख्याने नालेसफाई आणि धोकादायक इमारतींवरील कारवाईचा समावेश आहे.

टॅग्स :मुंबई