'घे भरारी रक्तदानासाठी', फक्त महिलांचे रक्तदान शिबिर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 03:32 PM2021-03-03T15:32:17+5:302021-03-03T15:33:06+5:30

only women's blood donation camp in kem hospital, mumbai : केईएम रुग्णालयात जीवनदाता सामाजिक संस्थेच्या महिला ग्रुपने जागतिक महिला दिन एका अनोख्या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे ठरविले आहे.

only women's blood donation camp in kem hospital, mumbai | 'घे भरारी रक्तदानासाठी', फक्त महिलांचे रक्तदान शिबिर!

'घे भरारी रक्तदानासाठी', फक्त महिलांचे रक्तदान शिबिर!

googlenewsNext

मुंबई : हल्लीच युग हे स्त्री-पुरुष खांद्याला खांदा लावून एकत्र चालणारं युग आहे, मग रक्तदानात मागे राहतील त्या महिला कसल्या. पोलीस दल, वैमानिक, मर्दानी खेळ, इतर अनेक क्षेत्रात तसेच पुरुषांची मक्तेदारी असलेल्या विविध क्षेत्रातही स्त्रिया आता मागे राहिलेल्या नाहीत. यातच आता एक नवीन पायंडा गेल्या वर्षापासून सुरू केला आहे. तो म्हणजे, जागतिक महिला दिन रक्तदान करून साजरा करायचा. (only women's blood donation camp in kem hospital, mumbai)

सामान्य, गरजू रुग्णांना अविरत सेवा देणाऱ्या केईएम रुग्णालयात जीवनदाता सामाजिक संस्थेच्या महिला ग्रुपने जागतिक महिला दिन एका अनोख्या सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचे ठरविले आहे. व त्याचेच औचित्य साधून जीवनदाता सामाजिक संस्था व केईएम रुग्णालयरक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने घे भरारी रक्तदानासाठी हे फक्त महिलांसाठीच रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.

जागतिक महिला दिन, सोमवार दिनांक ०८ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुंबईतील परेलमध्ये असलेल्या केईएम रुग्णालय आयोजित करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनी हळदीकुंकू समारंभ,पिकनिक, गेट टूगेदर व इतर अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित होत असतात. पण, याला अपवाद हा आगळा वेगळा अनोखा उपक्रम आहे. २०२० च्या रक्तदान शिबिरात अनेक महिलांनी आवर्जून उपस्थित राहून रक्तदान केले. 

२०२१ च्या रक्तदान शिबिरात यात खंड न पडू देता हा सामाजिक उपक्रम अधिक यशस्वीपणे सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करूनच यशस्वी करण्यावर भर असणार आहे. महिलासुद्धा कोविड योद्धे बनून सध्याच्या परिस्थितीवर मात करणार आहेत. यासाठीच एक पाऊल पूढे येऊन, न डगमगता सामाजिक उपक्रमात रक्तदान करून, वाघिणीचा ठसा उमटविण्याची संधी यावेळी या महिलांना लाभणार आहे.

हिमोग्लोबिन'च्या कमतरतेमुळे महिलांचे प्रमाण रक्तदानात कमी आहे हे मान्य पण शुन्य तर मुळीच नाही. फक्त महिलांचे रक्तदान शिबीर सुद्धा असू शकते. यातच महिला रक्तदानात मागे नाहीत याचे उत्तर मिळते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वीणा आमडोसकर, मनस्वी शिवलवकर, विजया जाधव, अंजली धुमाळ, सुजाता आव्हाड, अश्विनी म्हात्रे, शिल्पा सकपाळ, सुवर्णा कुळकर्णी, अश्विनी म्हात्रे, आरोही काळे,सिद्धी दळवी, श्रुती थळे, तृप्ती महाडिक, अपर्णा निमकर, जयश्री हांडे, अपर्णा पवार, मिनल कुडाळकर, आरती म्हात्रे, कविता ससाणे व  इतर अनेक महिलां विशेष मेहनत घेत आहेत.
 

Web Title: only women's blood donation camp in kem hospital, mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.