Join us  

कुलगुरू पदाच्या पेपरसाठी अवघी दोनच पाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 5:19 AM

आॅनलाइन उत्तरपत्रिकांच्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचा शोध सुरू झाला

मुंबई : आॅनलाइन उत्तरपत्रिकांच्या गोंधळामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर, मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंचा शोध सुरू झाला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी यासाठी समितीची स्थापना केली आहे, पण आता कुलगुरू म्हणून अर्ज करणाºयांनी फक्त दोनच पानांचे टिपण द्यायचे आहे. या दोन पानांत विद्यापीठाचा विकास, आव्हाने याबाबत मतप्रदर्शन करणे अशक्य असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.लवकरच नवीन कुलगुरूंची नियुक्ती केली जाईल. त्यासाठी उमेदवारांनी १४ फेब्रुवारीपर्यंत शोध समितीकडे अर्ज करायचे आहेत. मात्र अर्ज करताना दोन पानांचे टिपण द्यावे, अशी अट आहे. विद्यापीठाचा विकास, आव्हाने, त्यांचा सामना कशा करावा, आदींचा समावेश या टिपणामध्ये असतो. मात्र, फक्त दोन पानांमध्ये हा विषय मांडता येणार नाही, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

मुंबई विद्यापीठाचा आवाका वाढणारमुंबई विद्यापीठाचा आवाका येत्या वर्षात वाढणार आहे. विद्यापीठाशी संलग्न असणाºया महाविद्यालयांमध्ये आता नवीन ६२ महाविद्यालयांची भर पडणार आहे. त्यामुळे आता विद्यापीठाशी संलग्न असणाºया महाविद्यालयांची संख्या ८००वर जाणार आहे.मुंबई विद्यापीठाने प्रशासनाकडे बृहत आराखडा सादर केला आहे. या आराखड्यात नवीन ६२ महाविद्यालयांचा समावेश आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत येणाºया शिक्षण संस्थांकडून प्रथम ४५ नवीन महाविद्यालयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर, विद्यापीठाने आराखड्यात एकूण ६२ नवीन महाविद्यालयांचा प्रस्ताव पाठविला आहे. या ६२ महाविद्यालयांच्या प्रस्तावात कला, विज्ञान आणि वाणिज्य या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या एकूण २० महाविद्यालयांचा समावेश आहे. त्याचबरोबरीने विधि महाविद्यालयांसाठी तब्बल १२ प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. रात्र महाविद्यालयांसाठी ७ आणि फाइन आर्ट्सच्या ७ महाविद्यालयांचाही यात समावेश आहे.येत्या शैक्षणिक वर्षात नवीन महाविद्यालये सुरू होतील. त्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत या महाविद्यालयांना राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून इरादापत्र देण्यात येणार आहे. या महाविद्यालयांना नियम आणि अटींची पूर्तता करण्यासाठी एक वर्षाची संधी दिली जाणार आहे.