Join us  

केवळ २३ हजार फेरीवाले पात्र, ७३ हजार ३९० जण प्रतीक्षा यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 2:24 AM

मुंबईत फेरीचा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळविण्याकरिता अर्ज करणाऱ्या ९६ हजार ६५५ फेरीवाल्यांमध्ये केवळ २३ हजार २६५ अर्ज प्राथमिक तपासणीत पात्र ठरले आहेत, तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ७३ हजार ३९० फेरीवाले प्रतीक्षा यादीत आहेत.

मुंबई : मुंबईत फेरीचा व्यवसाय करण्यासाठी परवाना मिळविण्याकरिता अर्ज करणाऱ्या ९६ हजार ६५५ फेरीवाल्यांमध्ये केवळ २३ हजार २६५ अर्ज प्राथमिक तपासणीत पात्र ठरले आहेत, तर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ७३ हजार ३९० फेरीवाले प्रतीक्षा यादीत आहेत. त्यामुळे या फेरीवाल्यांना त्यांची कागदपत्रे सादर करण्यासाठी महापालिकेने एका महिन्याची मुदत दिली आहे.फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पालिकेने २०१४मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार, महापालिकेला ९९ हजार ४३७ अर्ज प्राप्त झाले. या अर्जांपैकी ९६ हजार ६५५ अर्जांची प्राथमिक तपासणी करण्यात आली, तर उर्वरित दोन हजार ७८२ अर्जांची प्राथमिक तपासणी सुरू आहे.या तपासणीदरम्यान २३ हजार २६५ अर्जदार पात्र ठरले आहेत.उर्वरित अर्जदारांना परवान्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची नोटीस नोंदणीकृत डाकच्या माध्यमातून (रजिस्टर्ड एडी) पाठविण्याचेआदेश, महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित सर्व सहायक आयुक्तांना दिले आहेत. सर्वअर्ज आल्यानंतर त्यांची छाननीहोऊन पात्र फेरीवाल्यांची अंतिमयादी तयार होणार आहे. त्यानंतरच गेली अनेक वर्षे रखडलेल्याफेरीवाला धोरणावर अंमल करणे महापालिकेला शक्य होणार आहे. मुंबईतील १ हजार १०० रस्त्यांवर ८९ हजार फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.>परवान्यासाठीअनिवार्य अटीभारताचे नागरिकत्व असावेसर्वेक्षणावेळी वयाची १४ वर्षे पूर्ण केलेली असावीत१ मे २०१४च्या पूर्वीपासून पथविक्रेता व्यवसाय असावामहाराष्ट्राचे अधिवासी असल्याचे प्रमाणपत्रअर्जदार स्वत: किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यामार्फतच पथविक्रेत्याचा व्यवसाय करेल, असे हमीपत्रउपजीविकेचे अन्य कोणतेही साधन नसल्याचे हमीपत्रअर्जदाराचे पथविक्रेता प्रमाणपत्र हे कोणत्याही परिस्थितीत कोणालाही भाड्याने देणार नाही किंवा करणार नाही याचे हमीपत्र.>२२ हजार ९७ पिचेसला मान्यतासर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व २४ विभागांतील २२ हजार ९७ पिचेसला मान्यता देण्यात आली आहे.मुंबईतील १ हजार १०० रस्त्यांवर ८९ हजार फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.मुुंबईत केवळ १५ हजार १५९ परवानाधारक फेरीवाला आहेत.२०१४मध्ये पालिकेने मागविलेल्या अर्जानुसार सव्वा लाख फेरीवाल्यांचे अर्ज आले. यामध्ये ९९ हजार ४३५ फेरीवाले पात्र ठरले आहेत.याबाबतची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावरील जलद दुवे या लिंक अंतर्गत उपलब्ध आहे.

टॅग्स :फेरीवाले