Join us  

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा गोंधळ, मुंबई विद्यापीठासमोर पुनर्मूल्याकंनाचे आव्हान कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 10:53 AM

मुंबई विद्यापीठाने उर्वरित 477 निकालांपैकी एकूण 475 निकाल जाहीर केले आहेत. आता टी.वाय. बीकॉम आयडॉलचा निकाल आणि एम. कॉमचा चौथ्या सत्राचा निकाल लागणं उरले आहे.

मुंबई, दि. 19 - मुंबई विद्यापीठाने उर्वरित 477 निकालांपैकी एकूण 475 निकाल जाहीर केले आहेत. आता टी.वाय. बीकॉम आयडॉलचा निकाल आणि एम. कॉमचा चौथ्या सत्राचा निकाल लागणं उरले आहे. आता दोनच निकाल लागणं बाकी असल्यामुळे लवकरच सर्व निकाल विद्यापीठ जाहीर करेल, अशी आशा पल्लवित झाली आहे. मात्र, हे निकाल जाहीर झाले असले तरीही पुनर्मूल्याकंनाचे आव्हान विद्यापीठासमोर कायम आहे.

ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा गोंधळप्राध्यापक हाताने उत्तरपत्रिकांची तपासणी करतात, एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी उत्तरपत्रिका जातात. या सर्व प्रकारात निकालांमध्ये गोंधळ होतो. त्यामुळे निकाल लागण्यास उशीर होत आहे. हा सर्व गोंधळ टाळून लवकर निकाल लावण्यासाठी मुंबई विद्यापीठात यंदा ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत आणण्यात आली, पण या पद्धतीचा बोजवारा उडला आहे.उत्तरपत्रिकांची सरमिसळ झाल्याने निकालाला काही प्रमाणात खीळ बसली आहे. पण, यातून मार्ग कधी आणि कसा निघणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुसरीकडे विद्यापीठातर्फे तपासणीचे काम सुरू असून, लवकरच निकाल जाहीर होतील, असे सांगण्यात येत आहे.या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक विद्यार्थ्यांचे परेदेशात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला जाण्याच्या मार्गात अडथळे आले. यामुळे हे प्रकरण थेट न्यायालयात गेले आहे. न्यायालयानेही विद्यापीठाला एकदा सुनावले आहे. आता पुन्हा एकदा सुनावणी आल्यावरही विद्यापीठात उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू आहे. त्यामुळे आता न्यायालयात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबई विद्यापीठात निकालांचा गोंधळ संपत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आता विद्यार्थी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. विद्यापीठ निकाल जाहीर करत नसल्यामुळे विद्यापीठाला टीकेचे धनी व्हावे लागत आहे.पडल्यामुळेच फाटल्या उत्तरपत्रिकाविद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका स्कॅनिंगसाठी नेताना परीक्षा भवनात दुस-या मजल्यावरुन पडल्यामुळे फाटल्याची चर्चा सध्या जोरात सुरू झाली होती. उत्तरपत्रिका फाटल्यामुळे स्कॅनिंगला तांत्रिक अडचणी येत असल्याची चर्चा याआधी रंगली होती. पण, मुंबई विद्यापीठाने यावर पडदा टाकला. असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही विद्यापीठातर्फे करण्यात आले आहे.