Join us  

दीड हजार घातक हत्यारांसह एकाला अटक

By admin | Published: October 03, 2014 2:35 AM

निवडणुकीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे.

मुंबई : निवडणुकीदरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबईत पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला आहे. त्यातच चुनाभट्टी परिसरात गुरुवारी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी दीड हजार चाकू आणि चॉपर हस्तगत केले आहेत. यामध्ये पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही निवडणुकांच्या तुलनेत यंदाच्या निवडणुका सर्वच पक्षांसाठी कठीण आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पैशांचे वाटप होण्याची शक्यता आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील सर्वच पोलिसांनी आपापल्या हद्दीमध्ये नाकाबंदी सुरू केली आहे. गुरुवारी चुनाभट्टी पोलिसांकडून प्रियदर्शनी येथे नाकाबंदी लावण्यात आली होती. याच दरम्यान एका टॅक्सीतून एक इसम संशयास्पद रितीने जात असताना पोलिसांना आढळून आला. 
पोलिसांनी टॅक्सी बाजूला घेऊन तपासणी केली असता, त्यामध्ये 11क् चॉपर आणि दीड हजार चाकू असा हत्यारांचा मोठा साठा आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी टॅक्सीसह टॅक्सीतून प्रवास करणारा अब्दुल हेमंत (3क्) याला ताब्यात घेतले. विक्रोळी येथे राहणारा हा इसम हत्यारांचा साठा कोठे आणि कशासाठी तसेच कोणासाठी घेऊन जात होता, याचा तपास आता चुनाभट्टी पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)