Join us  

शेअर बाजारात नुकसान झाल्याने एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 6:19 AM

मुलुंडच्या ५२ वर्षीय केतन कुमार मनसुखलाल दोशी यांनी एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली.

मुंबई : निवडणुकीच्या निकालानंतर शेअर मार्केटमध्ये झालेल्या उलाढालीत कोट्यवधीचे नुकसान झाल्याने मुलुंडच्या ५२ वर्षीय केतन कुमार मनसुखलाल दोशी यांनी एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. केतन कुमार दोशी (५६) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांना घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही.मुलुंडच्या अंतरिक्ष इमारतीत दोशी हे कुटुंबीयांसोबत राहायचे. त्यांनी २४ तारखेला मुलुंडच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून सीएसएमटीहून कन्याकुमारीला जाणाऱ्या एक्स्प्रेससमोर उडी घेत आत्महत्या केली.