one died after hoarding collapse near churchgate station | चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू
चर्चगेट स्टेशनजवळ होर्डिंगचा भाग कोसळून एकाचा मृत्यू

मुंबई- होर्डिंगचा काही भाग कोसळल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना चर्चगेट स्टेशनजवळ घडली. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर जखमी व्यक्तीला उपचारासाठी जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हे होर्डिंग नेमकं कशामुळे कोसळलं, याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

चर्चगेट स्टेशनजवळील एका होर्डिंगचा काही भाग दुपारी पावणे एकच्या सुमारास कोसळलं. यामध्ये मधुकर अप्पा नार्वेकर (वय 62 वर्षे) जखमी झाले. त्यांना जी. टी. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी नार्वेकर यांना मृत घोषित केलं. कोसळलेलं होर्डिंग रेल्वेच्या हद्दीत येत असल्याची माहिती समोर आली आहे. 


Web Title: one died after hoarding collapse near churchgate station
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.