Join us

एकाच दिवशी चार घरे फोडली

By admin | Updated: May 29, 2014 01:29 IST

एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरे फोडल्याचा चार घटना नोंदविण्यात आल्या आहेत

ठाणे : एकाच दिवशी शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात घरे फोडल्याचा चार घटना नोंदविण्यात आल्या आहेत. यामध्ये चोरट्यांनी रोख रक्कमेसह दागिने, टिव्ही असा सुमारे सहा लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. कासारवडवली नाका येथील संगिता मोदगेकर या कामानिमित्त दीड ते दोन तासांसाठी घर बंद करून गेल्या होत्या. याचदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचा लॉक स्क्रू-ड्रायव्हरने उचकटून ४ लाख ९० हजारांचे दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची माहिती कासारवडवली पोलीसांनी दिली.