मुंबई : उत्तर प्रदेशातील भाजपा खासदाराच्या मुलाला ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावाखाली एका महिलेने तिच्या चार साथीदारांच्या मदतीने चाकूचा धाक दाखवत लुबाडल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तसेच एका चालकालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र यातील महिला अद्याप फरार असून, तिचा शोध सुरू आहे.वाकोला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक अभिषेक प्रसाद (३५) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव असून, तो नालासोपारा येथील राहणारा आहे. त्यानेच रविवारी तक्रारदार मेहेरसिंग कुवरसिंग तनवर यांच्याकडे एका मुलीला पाठविले होते. याच मुलीने तिच्या साथीदारांच्या मदतीने त्यांना चाकूचा धाक दाखवत दीड लाख रुपये लुबाडून पळ काढला. (प्रतिनिधी)
खासदारपुत्र लूट प्रकरणी एकाला अटक
By admin | Updated: August 21, 2015 01:06 IST