Omicron Variant : मुंबईकरांना तूर्तास दिलासा; नऊपैकी सात कोरोना बाधित रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 10:50 PM2021-12-03T22:50:49+5:302021-12-03T22:51:36+5:30

Omicron Variant : कोविडचा नवीन व वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार आता जगभरात चिंतेचा विषय झाला आहे.

Omicron Variant: Seven out of nine corona-infected patients are less likely to have Omicron! | Omicron Variant : मुंबईकरांना तूर्तास दिलासा; नऊपैकी सात कोरोना बाधित रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता कमी!

Omicron Variant : मुंबईकरांना तूर्तास दिलासा; नऊपैकी सात कोरोना बाधित रुग्णांना ओमायक्रॉनची शक्यता कमी!

Next

मुंबई : ओमायक्रॉन संक्रमित देशांतून आलेल्या ४८५ प्रवाशांच्या चाचणीत कोरोना बाधित आढळून आलेल्या नऊपैकी सातजणांची ‘एस-जिन’ चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे या रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाली असण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे मुंबईला दिलासा मिळाला सून उर्वरित दोन रुग्णांच्या अहवालाची आता प्रतीक्षा आहे. 

कोविडचा नवीन व वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार आता जगभरात चिंतेचा विषय झाला आहे. कर्नाटकमध्ये दोन बाधित रुग्णांना अमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. दक्षिण आफ्रिकामधून मुंबईत येण्यासाठी थेट विमानसेवा नसली तरी दररोज मोठ्या संख्येने प्रवासी विमानमार्गे येत असतात. ओमायक्रॉन संक्रमित ४० देशांतून मागील महिन्याभरात २८६८ प्रवासी मुंबईत आले आहेत. 

यापैकी ४८५ प्रवाशांची कोविड चाचणी केल्यानंतर नऊजणांना कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. त्यामध्ये आठ मुंबईचे तर एक डोंबिवलीचा रहिवासी आहे. त्यांचा जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल मिळण्यास विलंब असल्याने सद्यस्थितीत ‘एस-जिन’ चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये सात रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही खबरदारी म्हणून आतापर्यंत बाधित आढळून आलेल्या सर्व १६ रुग्णांचे जिनोम सिक्वेंसिंग चाचणी करण्यात येत आहे. 

काही नमुने पाण्याला रवाना... 
पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंसिंग चाचणीची यंत्रणा आहे. मात्र या ठिकाणी एकावेळी २८८ नमुने ठेवावे लागतात. त्यामुळे तातडीने अहवाल मिळावेत यासाठी सर्व १६ बाधितांचे नमुने जिनोम सिक्वेंसिंग चाचणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच आमायक्रोनबाबतच्या सूचना जाहीर होण्याआधी मुंबईत आल्यानंतर कोरोना बाधित ठरलेल्या प्रवाशांचा शोधही पालिका घेत आहे. यामध्ये सात प्रवासी कोरोना बाधित असल्याचे आढळले आहेत. त्यामुळे ओमायक्रॉन संक्रमित देशातून आलेले एकूण १६ प्रवाशी कोरोना बाधित झाले आहेत. 

सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार... 
कोरोना बाधित आढळलेल्या नऊ प्रवाशांवर पालिकेच्या मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्थ करण्यात आली आहे. त्याचबरोबर एखाद्या उच्चभ्रू रुग्णाला खासगी रुग्णालयात उपचार घ्यायचे असल्यास बॉम्बे हॉस्पिटल आणि ब्रीच कँडी रुग्णालयातही बाधित प्रवाशांसाठी खाटा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: Omicron Variant: Seven out of nine corona-infected patients are less likely to have Omicron!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.