Join us

भांडुपमध्ये वृद्धेला लुटले

By admin | Updated: July 2, 2017 04:31 IST

भांडुपच्या मयुरेश पार्क परिसरात फेरफटका मारत असलेल्या वृद्धेची सोनसाखळी हिसकावल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भांडुपच्या मयुरेश पार्क परिसरात फेरफटका मारत असलेल्या वृद्धेची सोनसाखळी हिसकावल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. भांडुप पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय एस. भागवत या द्राक्षबाग परिसरात राहतात. शुक्रवारी रात्री जेवणानंतर त्या इमारतीखाली फेरफटका मारत होत्या. त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढला. त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षास याची माहिती दिली. त्यानुसार भांडुप पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.