Join us  

म्हातारीच्या बुटाला नवीन पॉलिश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 2:32 AM

गेल्या वर्षभरापासून नूतनीकरणासाठी बंद असलेल्या मुंबईतील कमला नेहरू पार्कचे द्वार गुरुवारपासून खुले होणार आहे. या उद्यानातील प्रसिद्ध म्हातारीचा बूट बच्चे कंपनीसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

मुंबई : गेल्या वर्षभरापासून नूतनीकरणासाठी बंद असलेल्या मुंबईतील कमला नेहरू पार्कचे द्वार गुरुवारपासून खुले होणार आहे. या उद्यानातील प्रसिद्ध म्हातारीचा बूट बच्चे कंपनीसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. ‘ये रे ये रे पावसा’ (मराठी), ‘मछली जल की रानी है’ (हिंदी), ‘बाबा ब्लॅक शिप’ (इंग्रजी) यांसारख्या बालगीतांनी हे उद्यान बहरणार आहे.

या उद्यानांच्या नूतनीकरणाचे काम २०१६मध्ये महापालिकेने हाती घेतले होते. यासाठी तब्बल २० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. यामध्ये दोन्ही उद्यानांना जोडणारा पादचारी पूल, उद्यानांचे विहंगलोकन करता येईल अशी तरुशिखर पायवाट, कमला नेहरू पार्कमधील व्ह्यूविंग गॅलेरीच्या विस्ताराचा समावेश आहे.

तीन टप्प्यांत चालणाºया या कामाच्या पहिल्या टप्प्यात कमला नेहरू पार्कचे गुरुवारी सायंकाळी उद्घाटन केले जाणार आहे. या उद्यानाचे क्षेत्रफळ ६६ हजार चौरस मीटर आहे. तर ४६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या हँगिंग गार्डनचे उद्घाटन नंतर होणार आहे. या दोन उद्यानांना भेट देणाºया पर्यटकांना तिथल्या निसर्गाचा आणि सभोवतालच्या विहंगम दृश्याचा आगळा-वेगळा आणि अभिनव अनुभव देण्यासाठी उद्यानातील विविध वृक्षांच्या उंचीच्या पातळीवरून जाणारी तरुशिखर पायवाटही तयार करण्यात येत आहे. स्कायवॉकप्रमाणे उंचावरून जाणारी ही पायवाट लोखंडी खांब आणि तारांचे दोरखंड यांच्या आधाराने उभी केली जाणार आहे.दोन उद्याने पुलाने जोडणारदोन्ही उद्यानांमधून बी. जी. खेर मार्ग हा रस्ता जातो. रहदारीमुळे जाण्या येण्यातल्या अडचणी लक्षात घेऊन दोघांना जोडणारा पूल बांधण्यात येत आहे.तसेच कमला नेहरू उद्यानातील गिरगाव चौपाटीच्या बाजूची संपूर्ण बाजू ही ‘व्ह्युइंग गॅलरी’ स्वरूपात रूपांतरित झाली आहे.कमला नेहरू उद्यानामध्ये ‘दोन छोटी तळी’ तयार केली आहेत. एका तळ्यात ‘लीली’सारखी चित्ताकर्षक फुले तर दुसºया तळ्यामध्ये रंगीबेरंगी मासे सोडण्यात येणार आहेत.म्हातारीच्या बुटाची तसेच दोन्ही तळ्यांच्या भिंतींची रंगरंगोटी करताना त्यावर लहान मुलांच्या चिरतरुण व लोकप्रिय गाण्यांतील संकल्पना मनोहारी पद्धतीने चित्रित केल्या आहेत.