विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मिळाला नवा बंगला; छगन भुजबळ पुन्हा 'रामटेक'वासी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 02:07 PM2019-12-02T14:07:40+5:302019-12-02T14:28:37+5:30

विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली होती.

Official residences allotted to Maharashtra CM Uddhav Thackeray and ministers Chhagan Bhujbal, Jayant Patil and Eknath Shinde. | विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मिळाला नवा बंगला; छगन भुजबळ पुन्हा 'रामटेक'वासी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना मिळाला नवा बंगला; छगन भुजबळ पुन्हा 'रामटेक'वासी

Next

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिल मधील 'सागर' या शासकीय बंगल्याचे वाटप करण्याचा निर्णय आज शासनाने घेतला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांना समुद्रकिनारी असलेला 'रामटेक' बंगला देण्यात आला आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आतापर्यत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार वर्षा बंगाला देण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे रॉयलस्टोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांना सेवासदन बंगला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांचा पुन्हा एकदा रामटेक बंगल्यात मुक्काम असणार आहे. याआधी आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना शासनाने त्यांना रामटेक बंगला देण्यात आला होता.

विधानसभा निवडणुकीनंतर प्रदीर्घ काळ सुरू असलेला सत्ता स्थापनेचा पेच संपुष्टात आल्यानंतर आज विधानसभा अध्यक्ष आणि विरोधीपक्षनेत्यांची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्षपदी काँग्रेस नेते नाना पटोले यांची निवड झाली. तर विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. 

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्र्यांनाही आपले बंगले सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याचसोबत मंत्रालयातील मंत्र्यांची कार्यालयेही रिक्त करण्यात आली होती. राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाल्याने प्रशासनाने तातडीने कार्यालय ताब्यात घेऊन बंगले रिकामे करण्यात आले होते. मात्र वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांना मुक्काम कायम होता. याच दरम्यान मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा शपथ घेतली हे संपूर्ण प्रकरण कोर्टात गेले. पण अजित पवारांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकार काही दिवसांत कोसळलं. दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावरच मुक्काम करत होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याने आता त्यांचा वर्षा बंगल्यावर मुक्काम आसणार आहे.

Web Title: Official residences allotted to Maharashtra CM Uddhav Thackeray and ministers Chhagan Bhujbal, Jayant Patil and Eknath Shinde.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.