‘That’ officer’s flight from Pune; The news of 'Lokmat' struck a chord | ‘त्या’ अधिकाऱ्याचे पुण्याहून विमानाने पलायन; ‘लोकमत’च्या वृत्ताने धाबे दणाणले

‘त्या’ अधिकाऱ्याचे पुण्याहून विमानाने पलायन; ‘लोकमत’च्या वृत्ताने धाबे दणाणले

मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागातील (आरटीओ) बढती आणि बदल्यांसाठी अर्थकारण करणारा संबंधित अधिकारी चांगलाच धास्तावला आहे. सोमवारी ‘त्या’ अधिका-याने पुण्याहून विमानाने वर्ध्याच्या दिशेने पलायन केले.
आरटीओतील बदली, बढतीसंदर्भात ‘आरटीओतील बदली अर्थकारणाच्या गिअरवर?’ या मथळ्यांतर्गत सोमवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर आरटीओ विभागात खळबळ उडाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वर्धा येथून एक अधिकारी मुंबईत दर मंगळवारी आणि बुधवारी येतो. हा अधिकारी अर्थपूर्ण व्यवहार केल्यानंतर बढती आणि बदलीचे नाव निश्चित करतो. आजही हा अधिकारी पुण्यात होता. तो मंगळवारी आणि बुधवारी मंत्रालयात हजेरी लावणार होता. पण लोकमतच्या वृत्तानंतर त्याने वर्ध्याच्या दिशेने पलायन केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, वर्धा येथील अधिकारी मुंबईत येऊन हजेरी लावत आहे, आज तो पुण्यावरून वर्ध्याला गेला याची कल्पना नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘त्या’ अधिका-यांच्या मनात धाकधूक
बदली आणि बढतीसाठी अनेक अधिका-यांनी या संबंधित अधिका-याशी अर्थपूर्ण व्यवहार केले आहेत. त्यामुळे या अधिका-यावर कारवाई झाल्यास आपल्या बढती किंवा बदलीचे काय होईल, याची चिंता काही जणांना आहे.

दोनदा केले होते निलंबित
या अधिका-याला पेण येथे कर्तव्यावर असताना इम्पोर्टेड दुचाकीतील करामध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणि अमरावती येथे एका अपघातात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले होते.

अधिका-यावर कृपाछत्र
लॉकडाऊनच्या काळात कामाचे ठिकाण सोडून अन्य ठिकाणी गेल्यामुळे नांदेड आरटीओ आणि पेण येथील आरटीओ यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ‘That’ officer’s flight from Pune; The news of 'Lokmat' struck a chord

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.