Join us

गुणांकनाचा प्रस्ताव लटकलेलाच

By admin | Updated: August 7, 2014 00:45 IST

वाहतुकीचे नियम तोडूनही वाहनचालक पुन्हा तोच-तोच गुन्हा सातत्याने करत असल्याने अशा चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कठोर पाऊल उचलण्यात आले.

मुंबई : वाहतुकीचे नियम तोडूनही वाहनचालक पुन्हा तोच-तोच गुन्हा सातत्याने करत असल्याने अशा चालकांना चाप लावण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कठोर पाऊल उचलण्यात आले. गुणांकन पद्धतीने गुन्ह्याचे स्वरूप ठरवतानाच त्यानुसार वाहनचालकावर कारवाई करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून तयार करण्यात आला होता. यात 30 गुणांनंतर वाहन परवानाच रद्द करतानाच 50 गुणांनंतर वाहन नोंदणीच रद्द करण्याचे प्रस्तावात नमूद होते. मात्र गेल्या वर्षी हा प्रस्ताव मंजुरीसाठी गृह विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्याला कुठलीही मंजुरी देण्यात आली नसून प्रस्ताव शासनदरबारी लटकल्याचे सूत्रंनी सांगितले. 
सिग्नल तोडणो, नो पार्किगमध्ये वाहन उभे करणो, ङोब्रा क्रॉसिंगच्याही पुढे वाहन उभे करणो, हेल्मेट किंवा सिटबेल्टशिवाय वाहन चालविणो, भरधाव वेगाने वाहन चालविणो, दारू पिऊन वाहन चालविणो असे अनेक गुन्हे वाहन चालकांकडून केले जातात. त्यांच्याकडून हे गुन्हे सातत्याने होत असून अशा गुन्हय़ांत वाढ झाली आहे. या वाहनचालकांवर फक्त दंडात्मक कारवाईच होत असल्याने पुन्हा तोच-तोच गुन्हा त्यांच्याकडून होत असल्याचे आढळते. याला चाप लावण्यासाठी गुणांवर आधारित गुन्ह्याचे स्वरूप ठरवून वाहनचालकावर कारवाई करण्याचा प्रस्ताव वाहतूक पोलिसांकडून तयार करण्यात आला होता. एखाद्या वाहनचालकाने पहिला गुन्हा केल्यास त्याच्यावर दहा गुण जमा होतील आणि त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी अपात्र ठरेल, असे प्रस्तावात नमूद होते. अशा त:हेने त्याने आणखी पाच वेळा गुन्हा केल्यास त्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्सबाबत वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र 50 गुण जमा झाल्यानंतर त्या वाहनचालकाची वाहन नोंदणीच रजिस्ट्रेशनच रद्द केली जाणार होती. ऑक्टोबर 2013 मध्ये हा प्रस्ताव तयार झाल्यानंतर एक महिन्यातच तो गृहविभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला. मात्र त्याला मंजुरी मिळाली नसून हा प्रस्ताव अजूनही लटकलेलाच आहे. (प्रतिनिधी)