सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’; मुंबईच्या हवामानात ‘ताप’ दायक बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 03:03 PM2020-09-05T15:03:13+5:302020-09-05T15:03:54+5:30

पावसाळ्यातच मुंबईकरांना फुटला घाम

‘October hit’ in September itself; 'Fever' changes in Mumbai's climate | सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’; मुंबईच्या हवामानात ‘ताप’ दायक बदल

सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हिट’; मुंबईच्या हवामानात ‘ताप’ दायक बदल

Next

मुंबई : पावसाने थोडी कुठे उघडीप घेतली तोच मुंबईत वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे. शुक्रवारसोबत शनिवारीदेखील मुंबईकरांना ऊन्हाचे वाढीव चटके बसले असले असून, पुढील दोन ते तीन दिवस ‘ताप’ दायक वातावरण कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामानात अचानक झालेल्या या बदलामुळे मुंबईकरांना सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिटचा तडाखा बसू लागला असून, मुंबईकरांच्या शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.

राज्यासह मुंबईत धो धो कोसळलेला मान्सून आता ब-यापैकी विश्रांतीवर आहे. राज्यात अद्यापही ठिकाणी मान्सून कोसळत असून, मुंबईत मात्र त्याने ब-यापैकी विश्रांती घेतली आहे. विशेषत: शुक्रवारीच मुंबईकरांना चढत्या पा-याचा किंचित अनुभव आला होता. शनिवारी त्यात आणखी भर पडली; आणि हवामान खात्यानेदेखील तापमानात वाढ नोंदविली. विशेषत: शनिवारी सकाळी अकरा वाजल्यापासून मुंबईकरांना ऊन्हाचे चटके बसू लागले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तर अक्षरश: शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या. ऊनं आणि ऊकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला. दुपारी बारा वाजता पडलेले रखरखीत ऊनं दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत कायम होते. एक तर कोरोना आणि त्यात हा ऊकाडा अशा दुहेरी वातावरणाने मुंबईला शनिवारी कोंडीत पकडले होते. दुपारदरम्यान मुंबईच्या रस्त्यांवर  पडलेले ऊनं अक्षरश: पोळत होते. अशा रखरखीत ऊन्हापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी छत्रीचा वापर केला होता. तर बाजारपेठांमध्ये देखील भाजी विक्रेत्यांनी पावसाळ्यात वापरात येणारी छत्री शनिवारी ऊन्हापासून बचाव व्हावा म्हणून वापरल्याचे चित्र होते.

......................

शुक्रवारी मध्यरात्री २ ते ३ दरम्यान आकाशात ढगांचा गडगडाट सुरु होता. तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक  सरी देखील कोसळल्या. कुलाबा येथे १५ आणि सांताक्रूझ येथे ६.९ मिलीमीटर एवढया पावसाची नोंद झाली. याचदरम्यान ३ ठिकाणी बांधकामांचा भाग कोसळला. ३ ठिकाणी झाडे कोसळली. १३ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या.

......................

मुंबईमध्ये सध्या तापमान वाढ जाणवत आहे. उकाडा पण जास्त आहे. गेल्या ४, ५ दिवसात कमी पाऊस, दिवसा ऊन, संध्याकाळी ढगाळ आकाश, गडगडाटासह पाऊस असून, त्याचा एकत्रित परिणाम जाणवत आहे. वातावरणातील या अचानक बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वातावरण असेच पुढचे काही दिवस असण्याची शक्यता आहे.

- कृष्णानंद होसाळीकर, उप महासंचालक, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग 
  

Web Title: ‘October hit’ in September itself; 'Fever' changes in Mumbai's climate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.