Join us  

मुंब्य्रात नुरानी इमारत झुकली , १६ कुटुंबांना महापालिका शाळेत हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2017 5:30 AM

मुंब्य्रातील एक इमारत बाजूच्या इमारतीवर झुकली आहे. यामुळे तेथील रहिवाशांना महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. गुरु वारी मुंबईतील भेंडीबाजार येथील कोसळलेल्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेल्या या घटनेमुळे, येथील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंब्रा : मुंब्य्रातील एक इमारत बाजूच्या इमारतीवर झुकली आहे. यामुळे तेथील रहिवाशांना महापालिकेच्या शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. गुरु वारी मुंबईतील भेंडीबाजार येथील कोसळलेल्या इमारतीच्या पार्श्वभूमीवर उघडकीस आलेल्या या घटनेमुळे, येथील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.येथील ठाकुरपाडा परिसरातील नुरानी ए विंग ही ४० वर्षांपूर्वीची तळ अधिक चार मजली इमारत, ठामपाने अतिधोकादायक म्हणून घोषित केली होती. ती इमारत बाजूच्या पारितोष अपार्टमेंन्ट या इमारतीच्या दिशेने झुकल्याचे शुक्र वारी सकाळी निर्दशनास आले. यामुळे कोणत्याही क्षणी अनुचित घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून, त्या इमारतीमध्ये राहणाºया १६ कुटुंबांना, तसेच ९ गाळेधारकांना त्वरित इमारत खाली करण्याचे निर्देश ठामपाच्या अधिकाºयांनी दिले. इमारतीमधील रहिवाशांची तात्पुरती राहाण्याची व्यवस्था, मुंब्रा बाजारपेठेतील ठाणे महापालिकेच्या शाळेत केल्याची माहिती उपायुक्त मनिष जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली. सदर इमारतीच्या दुरु स्तीसाठी प्रत्येक सदनिकाधारकांनी ४० हजार रु पये इमारतीतीलच एका जबाबदार व्यक्तीकडे जमा केले होते, परंतु दोन ते तीन रहिवाशांनी पैसे न दिल्यामुळे, इमारत पूर्ण दुरुस्त न करता, तात्पुरती दुरु स्ती करण्यात आली होती, अशी माहिती या इमारतीतील रहिवासी मुलीने दिली.