ठाणो : सध्या विविध ठिकाणी डेंग्यूने डोके वर काढल्याने यावर उपाय योजना करण्यासाठी आणि याचा फैलाव रोखण्यासाठी ठाणो महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विविध प्रकारच्या उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यानुसार महापालिकेच्या 25 आरोग्य केंद्रात डेंग्यू तपासणी कीट्स ठेवण्यात येणार असून, येणा:या रुग्णाची ऑन दी स्पॉट रक्त तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक केंद्रात अशा प्रकारचे 5क् किट्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी आणि स्वच्छता आहे अथवा नाही, याची पाहणी करण्यासाठी 1क्क् कर्मचा:यांची टीम सज्ज झाली आहे.
ठाण्यात घोडबंदर भागातील एका सोसायटीत काही दिवसांपूर्वी 11 वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला होता. तसेच याच सोसायटीमधील अन्य दहा ते 12 जणांना देखील या आजाराची लागण झाली होती. जानेवारी ते जून 2क्14 र्पयत 23 जणांना डेंग्यूची लागण झाली होती. परंतु पुन्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची कबुली आरोग्य विभागाने दिली आहे. त्यानुसार या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी शुक्रवारी मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर. टी. केंद्रे यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली. या बैठकीला मेडीकल ऑफीसर, डॉक्टर, 25 आरोग्य केंद्राचे प्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी 1क्क् कर्मचा:यांना आता ठाणोकरांच्या घरोघरी जाऊन पाण्याच्या साठवणुकीची पाहणी करणार आहेत. तसेच घरातील कोणाला ताप आला असल्यास त्याची तत्काळ त्याच ठिकाणी रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जाणार आहे. रोज सुमारे 2क् हजार घरे फिरुन त्याचा रोजचा अहवाल मेडीकल ऑफीसरकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. एका कर्मचा:याने रोज 13क् घरांना भेटी द्यायचा आहेत. तसेच या कर्मचा:यांकडून जनजागृती देखील केली जाणार आहे.
आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आलेल्या आणि संशयीत रुग्ण आढळल्यास त्याच ठिकाणी डेंग्यू तपासणी किट्सद्वारे त्याच्या रक्ताची तपासणी केली जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक आरोग्य केंद्रात 5क् किट्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
पालिकेने केलेल्या सूचना..
4आपले घर आणि परिसरातील स्वच्छ स्थिर पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. त्यामुळे नियमितपणो पाणी बदला, फुलदाण्या व शोभिवंत झाडांचे पाणी नियमीत बदला. साचलेले पाणी काढून टाका कुंडय़ाखाली असलेल्या बश्या, फ्रिजचे डिफ्रॅास्ट ट्रे व ए.सी. डक्टमध्ये साचलेले पाणी काढून टाका. अनावश्यक वस्तू काढून टाका पावसाचे पाणी साचेल अशा कोणत्याही वस्तू ठेवू नयेत.
4मच्छरांची पैदास वाढू नये आणि मलेरीया आणि डेंग्यूची साथ आटोक्यात राहावी यासाठी आरोग्य विभागामार्फत 95 हजार 783 गृहनिर्माण संस्थांना मराठीतून, 22क्17 हिंदीत पोस्टरद्वारे सूचना देण्यात आल्या आहेत. तर टायरच्या 291 दुकानांना, 231 विकासकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच 17614 घरोघरी जाऊन पोस्टर वाटण्यात आले आहेत. 1471 व्हेंट नायलॉन जाळ्या बसण्यात आल्या आहेत. याशिवाय 187 खाजगी रुग्णालयांना सूचनाद्वारे रुग्णांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे.