Join us  

आता माटुंगा रोडही महिला विशेष स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 6:12 AM

महिला दिनाच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वे महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकानंतर आता माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचे कामकाज आणि देखभालही महिला कर्मचाºयांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मुंबई  - महिला दिनाच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वे महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकानंतर आता माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचे कामकाज आणि देखभालही महिला कर्मचाºयांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ८ मार्चला जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेवर आणखी एका महिला विशेष स्थानकाची भर पडेल.सर्व रेल्वे मंडळांनी महिला विशेष स्थानकासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना रेल्वे मंत्रालयाने केल्या आहेत. सद्य:स्थितीत मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकाचे सर्व कामकाज महिला पाहत आहेत. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेने महिला विशेष स्थानकासाठी माटुंगा रोड स्थानकाची निवड केली आहे. या स्थानकात दोन फलाट आहेत. स्थानकात तिकीट तपासनीस, बुकिंग अधिकारी, स्वच्छता कर्मचारी आणि स्थानक सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी अशा सर्व ठिकाणी महिला कर्मचाºयांची नियुक्ती पूर्ण झाली आहे. संबंधित महिला अधिकारी आणि कर्मचाºयांना ८ मार्चपासून स्थानकाचा ‘चार्ज’ घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जागतिक महिला दिनापासून माटुंगा रोड हे स्थानक महिला विशेष स्थानक म्हणून कार्यान्वित होईल. सद्य:स्थितीत स्थानकात १ स्थानक व्यवस्थापक , ३ तिकीट तपासनीस, ५ ते ६ रेल्वे सुरक्षा बल कर्मचारी, बुकिंग कार्यालयात कार्यरत असणारे सुमारे १२ ते १३ कर्मचारी आणि २ ते ३ स्वच्छता कर्मचारी असे एकूण २५ कर्मचारी आहेत. या कर्मचाºयांकडून माटुंगा रोड स्थानकाची देखभाल केली जाते, असे पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले. यापुढे ही सर्व कामे महिलाच करणार आहेत.पश्चिम रेल्वेवरील विद्यार्थ्यांचे स्थानक म्हणून माटुंगा रोड ओळखले जाते. स्थानकाजवळ महाविद्यालय असल्याने स्थानकावर विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. सुरक्षिततेसाठी स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून प्रवाशांच्या सुविधेसाठी तिकीट खिडकीसह एटीव्हीएमचीदेखील व्यवस्था स्थानकात करण्यात आली आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई लोकल