हितेन नाईक - पालघर
समुद्रातील वादळी वारे, गणपती-गौरीच्या सुटीनंतर आता दिवाळीच्या सुटीसाठी घरी गेलेले विक्रमगड, जव्हारमधील खलाशी अजून मासेमारीसाठी परतलेले नाहीत. त्यांना परत आणण्यासाठी त्यांच्या घरी रोज चकरा मारून नौकामालक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे खलाशांविना नौका किना:यावर पडून आहेत.
सातपाटी, मुरबे, एडवण, वडराई, उच्छेळी-दांडी इ. भागांतील मच्छीमारी नौकांमध्ये 2 ते 3 हजार आदिवासी खलाशी कामगारांना रोजगार पुरविला जातो. पावसाळ्यात भातरोपणी ते कापणीनंतर हाताला काम नसलेल्या आदिवासी बांधवांना ख:या अर्थाने वर्षानुवर्षापासून रोजगाराची उत्तम संधी मच्छीमार व्यवसायाने मिळवून दिली आहे. भरघोस पगार, दोन्ही वेळचे विनामूल्य जेवण, नाश्ता, कपडे, औषधोपचार सुविधेसह 2 ते 3 लाखांच्या विम्याचे संरक्षण या व्यवसायात सहकारी संस्था व नौकामालकांकडून दिले जात आहेत. 8 ते 1क् हजार प्रति महिना खलाशी कामगार, तर 25 ते 3क् हजार तांडेल कामगाराला पगार दिला जातो. 3क् ते 4क् वर्षापासून अनेक कुटुंबे पिढय़ान्पिढय़ा या मासेमारी व्यवसायात सक्रिय आहेत.
कालांतराने रेती व्यवसाय, वीटभट्टी व्यवसाय, बांधकाम व्यवसाय, कारखाने इ. कामांत कामगारांची मागणी वाढल्याने विक्रमगड, जव्हार, तलासरी, डहाणू इ. भागांतील कामगार विविध कामांमध्ये विभागले गेले. परंतु, इतर रोजगारांपेक्षा मासेमारी व्यवसायाला आपलेपणा व अधिक सुरक्षितता वाटत असल्याने 3 ते 4 हजारांचा कामगारवर्ग आजही मासेमारी व्यवसायाला प्रथम पसंती देत असल्याचे दिसून येते. मात्र, या व्यवसायात स्पर्धा वाढू लागल्याने पालघर, वसई, डहाणू, गुजरात इ. भागांतील नौकामालकांची इतरांपेक्षा जास्त पगार व त्याअनुषंगाने आगाऊ रकमा देण्याची प्रवृत्ती या व्यवसायाला मारक ठरू लागल्याचे जिल्हा मच्छीमार सल्लागार समितीचे सदस्य सुभाष तामोरे यांनी सांगितले. याचा विपरीत परिणाम मासेमारी व्यवसायावर होत असल्याने विविध किनारपट्टय़ांवरील नौका खलाशी-कामगारांविना किना:यावर पडून आहेत. गणपती-गौरीच्या 1क् दिवसांच्या पगारी सुटीनंतर आता 18-19 ऑक्टोबरपासून दिवाळीच्या सुटीवर गेलेले बहुतांशी खलाशी, कामगार आता कामावर येण्यास चालढकल करू लागले आहेत. त्यामुळे रोज पाडय़ामध्ये चकरा मारून नौकामालक बेजार झाल्याचे अरविंद भोईर यांनी सांगितले.
पूर्वी मासेमारी व्यवसायामध्ये खूप अंगमेहनतीची कामे होती. परंतु, आता नौकांवर विंच, जीपीएस, वायरलेस सेट इत्यादींसह किना:यावर जेटय़ांसारख्या सुविधा निर्माण झाल्याने कामगारांची अंगमेहनतीची बहुतांशी कामे बंद झाली आहेत.
- विश्वास पाटील,
माजी व्यवस्थापक, सर्वोदय सहकारी संस्था