Join us  

नोटाबंदीचे ८ नोव्हेंबरला राज्यभर वर्षश्राद्ध, देशातील प्रमुख शहरांत मोर्चे निघणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 6:22 AM

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभर गोंधळ उडाला.

योगेश बिडवई मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर देशभर गोंधळ उडाला. केंद्र सरकारच्या निर्णयाचा असंघटीत क्षेत्र व शेतक-यांना मोठा फटका बसला, त्याचा निषेध करणे, त्यांना नुकसान भरपाई मिळणे व सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी देशभर विविध संघटना-पक्षांकडून ८ नोव्हेंबरला नोटबंदीचे प्रथम वर्षश्राद्ध घालण्यात येणार आहे.रिझर्व्ह बँकेच्या अहवालात सुमारे ९९ टक्के बाद नोटा जमा झाल्याचे सांगण्यात आले. मग काळा पैसा कुठे गेला, असा सवाल मुंबईतील मोर्चाचे नियोजन करणारे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांनी केला आहे. मुंबईत २७ आॅक्टोबरला नियोजनासाठी बैठक होईल, असे ते म्हणाले. लोकांना त्यांचे हक्काचे पैसे बँकेतून काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. त्याचा ज्येष्ठ नागरिक व महिलांना मोठा त्रास झाला. नोटबंदीनंतर अर्थव्यवस्था घसरली. अनेकांना रोजगाराला मुकावे लागले. त्यावर पंतप्रधान व रिझर्व्ह बँकेने बोलावे, असे समन्वय समितीचे म्हणणे आहे.राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व कोल्हापूर येथे समित्या स्थापन झाल्या आहेत. इतर शहरांमध्ये लवकरच समित्या स्थापन होतील. मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी सूकाणू समितीचे पदाधिकारी मोर्चात सहभागी होतील. दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, वाराणसी व गुजरातमध्येही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चासाठी बैठका घेण्यास सुरूवात केली आहे, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी दिली.>नुकसान भरपाईची मागणीनोटबंदीने नुकसान झालेल्या घटकांना सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी ८ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. मोर्चेकरी एक निवेदन वाचतील. त्याची प्रत रिझर्व्ह बँक व सरकारला पाठविण्यात येईल.नोटबंदीने उद्योगाचे नुकसान झाले, हे मान्य करण्यास सरकार तयार नाही. असंघटीत क्षेत्र व शेतीवर देशातील ८५ टक्के लोक अवलंबून आहेत. त्यांना सर्वाधिक फटका बसला. सरकारचे त्याकडे लक्ष वेधणार आहोत.- सुरेश सावंत,सामाजिक कार्यकर्ते, मुंबई