Join us

28 नोव्हेंबर सेनेचा ‘वीर दिन’

By admin | Updated: November 12, 2014 02:03 IST

तहाचा बहाणा करून कपट करून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला, तो 28 नोव्हेंबरचा दिवस राज्यात ‘वीर दिन’ म्हणून साजरा करण्यास सरकारने मान्यता दिली

मुंबई : तहाचा बहाणा करून कपट करून आलेल्या अफझलखानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा बाहेर काढला, तो 28 नोव्हेंबरचा दिवस राज्यात ‘वीर दिन’ म्हणून साजरा करण्यास सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेनेचे विधान परिषदेतील गटनेते दिवाकर रावते यांनी दिली. अफझलखानाचा कोथळा काढण्याचा दिवस महाराष्ट्रात ‘वीर दिन’ म्हणून साजरा करण्याची मागणी शिवसेना सातत्याने करीत होती. राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सरकार असताना तसा सोहळा आयोजित केला जात होता. मात्र सत्तांतरानंतर वीर दिन साजरा करणो बंद झाले. आता पुन्हा हा दिवस वीर दिन म्हणून पाळण्यात येईल, असे रावते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)