पंचतन : ग्रामपंचायतीने पावसाळापूर्वीच्या नालेसफाईचे काम हाती घेतले असून महत्वाचे मोठे नाले, गटारे, नदीचे पात्र सफाईचे काम जोरात सुरु आहे. एसटी स्टँड, गुडलक मोहल्ला जवळ इमारतीच्या करण्यात आलेल्या बांधकामामुळे काही ठिकाणाचे नाले यामध्ये गडब झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावर गतवर्षीपर्यंत आले होते. सदरची बंद झालेली गटारे साफ करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सरपंच गणेश पाटील यांनी सांगितले. तसेच गणपती विसर्जन घाट, नदीचे पात्र, छोटी-मोठी गटारे, नाले यांच्या सफाईचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणी पाणी साचणार नाही, अशी उपाययोजना सुरु असल्याचे सरपंचांनी सांगितले.
बोर्ली पंचतनमध्ये नालेसफाईला वेग बोर्ली
By admin | Updated: May 31, 2014 02:20 IST