Join us

गांधी हत्येच्या तपासासाठी आयोग नेमा

By admin | Updated: May 27, 2016 01:34 IST

महात्मा गांधी यांच्या हत्येची चौकशी पुन्हा एकदा नव्याने करण्यात यावी, यासाठी आयोगाची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अभिनव भारत या संघटनेने उच्च

मुंबई: महात्मा गांधी यांच्या हत्येची चौकशी पुन्हा एकदा नव्याने करण्यात यावी, यासाठी आयोगाची नियुक्ती करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अभिनव भारत या संघटनेने उच्च न्यायालयात केली आहे. जूनमध्ये या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.गांधी हत्येप्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तत्कालीन जे. एल. कपूर आयोगाने सखोल चौकशी केली नाही. हत्येच्या कटाबाबत नीट माहिती या अहवालत उपलब्ध नाही. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यासाठी नव्याने आयोग नेमण्यात यावा, अशी मागणी अभिनव भारतचे विश्वस्त, लेखक, संशोधक डॉ. पंकज फडणीस यांनी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेवरील सुनावणी ६ जून रोजी होण्याची शक्यता आहे. नवीन आयोग नेमून गांधीजींना चौथी गोळी कोणी झाडली? नथुराम गोडसे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणी कट रचला होता, याची चौकशी या आयोगाला कराण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)