ना आमदारकीचा थाट, ना कार्यकर्त्यांची गर्दी, रोहित पवारांचा 'लोकल' प्रवास

By महेश गलांडे | Published: December 8, 2020 07:48 AM2020-12-08T07:48:44+5:302020-12-08T07:49:24+5:30

कोविड 19 च्या परिस्थितीमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीपासून मुंबईतील लोकससेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता ही लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

No security guards, no crowd of activists, Rohit Pawar's 'local' journey | ना आमदारकीचा थाट, ना कार्यकर्त्यांची गर्दी, रोहित पवारांचा 'लोकल' प्रवास

ना आमदारकीचा थाट, ना कार्यकर्त्यांची गर्दी, रोहित पवारांचा 'लोकल' प्रवास

Next
ठळक मुद्देकोविड 19 च्या परिस्थितीमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीपासून मुंबईतील लोकससेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता ही लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मुंबईलोकलने प्रवास केला आहे. आमदार रोहित पवार एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांप्रमाणेच आपल्या सहकाऱ्यांशी वागतात, अनेकदा सोशल मीडियातून ते आपलं साधारण वागणं कार्यकर्त्यांसाठी शेअर करत असतात. मग, एखाद्या आजीच्या घरी जाऊन जेवण करणं असेल किंवा सहजच एखाद्या दुकानात जाऊन खेळणी खरेदी करणं असेल. आता, पुन्हा एकदा लोकल प्रवासाने रोहित पवारांनी कार्यकर्त्यांची मने जिंकली आहेत. 

''मुंबईत कॉलेजला असताना अनेकदा लोकलनं प्रवास करायचो. काल बऱ्याच दिवसांनी एका कामानिमीत्त अंधेरी ते मीरा रोड दरम्यान लोकलनं प्रवास करण्याचा योग आला आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. कोरोनाच्या संकटावर मात करून आपल्या मुंबईची ही लाईफ लाईन लवकरच पूर्ववत होईल अशी आशा करतो, असे म्हणत रोहित पवार यांनी आपल्या लोकल प्रवासाचे फोटो ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीही रोहित पवार यांनी मुंबईतील बडेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकलने प्रवास केला होता. त्यावेळी, मी एक दिवस त्यांच्यातला डबेवाला बनल्याचं सांगताना, डबेवाल्यांसोबतच्या एक दिवसाचा अनुभव रोहित यांनी शेअर केला होता.  

कोविड 19 च्या परिस्थितीमुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा करण्यापूर्वीपासून मुंबईतील लोकससेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता ही लोकलसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, अद्यापही सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवेचा लाभ घेता येत नाही. त्यातच, लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी पूर्वीप्रमाणे सुरू व्हावी, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
 

Web Title: No security guards, no crowd of activists, Rohit Pawar's 'local' journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.